आसिस्टंट सेक्शन आँफिसरपदी सचिन काळभोर

Image may contain: 1 person, sittingरांजणगाव सांडस, ता. 28 एप्रिल 2018 (प्रमोल कुसेकर): महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाअंतर्गत २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या असिंस्टट सेक्शन आँफिसर परिक्षेत (मंञालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी) रांजणगाव सांडस-राक्षेवाडी (ता. शिरुर) येथील सचिन भिमराव काळभोर हा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला. या बद्दल रांजणगाव सांडस ग्रामस्थाच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.

सचिनचे प्राथमिक शिक्षण राक्षेवाडी-रांजणगाव सांडस येथील प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण रांजणगाव येथील संतराज विद्यालयात झाले आहे. उच्च माध्यमिक शिक्षण शिरूर येथील विद्याधाम प्रशाला येथे झाले आहे. महाविद्यालयीन कृषी पदवी पिंपरी येथील डी.वाय पाटील महाविद्यालयात घेतली आहे. यावेळी पुणे जिल्हा दुध संघाचे (काञज) संचालक जीवन तांबे, पुणे जिल्हा दुध संघाचे माजी संचालक संभाजी रणदिवे, आनंदराव लोखंडे, सरपंच, भिमराव काळभोर, बापू राक्षे, सुधीर राक्षे, अमोल काळभोर, रामदास काळभोर, सुखदेव राक्षे, संदीप काळभोर, तात्या काळभोर, श्यामराव रणपिसे, राजेंद्र रणदिवे, सुभाष राक्षे, सदाशिव राक्षे, अतुल थोरात, प्रविण निंबाळकर उपस्थित होते.

या यशाबाबत बोलताना सचिनचे वडिल भिमराव काळभोर म्हणाले सचिनने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवल्याने आम्हा सर्व कुटुंबियासह, नातेवाईक, मिञमंडळी या सर्वाना खुप आनंद झाला आहे. त्याला लहानपणापासून स्पर्धा परिक्षेचे आकर्षक होते. त्याने त्यादृष्टीने प्रयत्न केल्याने हे त्याचे फलित आहे.

पारदर्शक व लोकहिताची कामे करण्यावर भर
या यशावर बोलताना सचिन म्हणाला शासनाचा कारभार अधिक लोकहित व पारदर्शक करण्यावरती माझा भर राहून शासकिय यंञणेवरील लोकांचा विश्वास अधिक दृढ करण्यावरती माझा भर राहील.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या