न्हावरेत अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

No automatic alt text available.
न्हावरे, ता.१ मे २०१८ (प्रतिनिधी) :
न्हावरे येथील कोळआळी येथे  तरुणाच्या नेहमीच्या  त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीसांनी  सुहास उर्फ सनी जगन्नाथ मोरे(रा.न्हावरे)याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व मयत मुलीच्या वडिलांनी दिलेली फिर्याद पुढील प्रमाणे, तीन आठवड्या पूर्वी अल्पवयीन मुलगी शाळेत ये जात असताना आरोपी सनी हा मुलीला रस्त्यात आडवुन 'माझे तुझ्यावर प्रेम आहे' असे म्हणून ञास देत असे.ही गोष्ट पिडीत मुलीने आपल्या आईला सांगितली.आई ने मुलीच्या वडिलांना सांगितले.त्यानंतर मुलीच्या वडिलांनी सनी मोरे यांस समक्ष भेटून असा वागू नको मुलीला त्रास देऊ नको म्हणून दीपक कोहकडे व किरण नवले यांच्या समोर संगितले होते.त्यानंतर 28एप्रिल दुपारी अडीच वाजता मुलीचे वडील घरी येत असताना त्यांना घरासमोर सनी हा मुलीचा हात पकडून काहीतरी बोलत असल्याचे दिसले सनी ने मुलीच्या वडिलांना पाहून तेथून पळ काढला.

वडिलांनी मुलीला काय झाले विचारले असता सनी याने ञास दिला.व त्यास मी नकार दिल्याने त्याने मला मारहाण केली असल्याची पीडित मुलीने वडीलांना सांगितले.याबाबत आपण पोलिसात फिर्याद देऊ असे वडिलांनी मुलीला संगितले.ऊन जास्त असल्याने सायंकाळी जाऊ असे सांगितले.त्यावेळी पीडित मुलीने मी सनी मोरेच्या त्रासाला वैतागले असे संगितले. त्यानंतर वडील घरात गेले.त्यानंतर सायंकाळी पाचच्या दरम्यान मुलीच्या नात्यातील महिलेने घराचा दरवाजा वाजवून पीडित मुलीच्या वडिलांना मुलगी दिसत नसल्याचे सांगितले.तिचा शोध घेतला असता मुलगी सापडली नाही परंतु घराच्या बाथरूम संडास दरवाजा आतून बंद असल्याचे मुलीच्या वडिलांच्या लक्षात आले.त्यांनी दरवाजा वाजवला तो उघडला नाही म्हणून त्यांनी पाठीमागे खिडकीतून डोकावले असता मुलीने बाथरूम च्या छताला ओढणीने गळफास घेतला होता.

याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली असून, सनी जगन्नाथ मोरे यांच्या विरोधात विनयभंग, आत्म्हत्येस प्रव्रुत्त करणे, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (पॉस्को कायदा) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक बी बी पाटील हे करीत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या