एनएसएस परीक्षेत विठ्ठलवाडी शाळेचे यश

Image may contain: 11 people, people smiling, people standingविठ्ठलवाडी, ता.१ मे २०१८ (प्रा.एन.बी.मुल्ला) : एनएसएस नॅशनल स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी येथील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी सम्यक सुचित लोंढे हा राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत राज्यात सोळावा आला.          

सम्यक लोंढे याने २०० पैकी १६८ गुण मिळवून राज्यात सोळावा क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यास शाळेतील उपशिक्षिका नीलिमा शिंदे, मुख्याध्यापक मारुती निकम यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी  विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले. विठ्ठलवाडी ग्रामपंचायत,श्री पांडुरंग विद्या मंदिर यांच्या वतीने सम्यक लोंढे याचा सन्मान करण्यात आला.

यावेळी उपसरपंच बाबाजी गवारे, माजी उपसरपंच राजेंद्र शिंदे, दिलीप गवारे,किसन गवारे, मुख्याध्यापक राजाराम नजन, ज्येष्ठ शिक्षक सुरेश थोरात, शिरूर तालुका कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष प्रवीण जगताप,प्रा.बाळासाहेब गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या