कासारीत 'आयुष्यमान भारत अभियानाचा' शुभारंभ

Image may contain: 2 people, people smiling, people standingकासारी, ता. १ मे २०१८ (प्रा.एन.बी.मुल्ला) : कासारी येथे 'आयुष्यमान भारत राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा' अभियानाचा शुभारंभ खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आला.

सांसद आदर्श ग्राम कासारी (ता. शिरूर) येथे आयुष्यमान भारत राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना खासदार शिरोळे म्हणाले की प्रत्येक व्यक्तीला शासनाच्या वतीने चांगल्या आरोग्य सुविधा पुरवून त्यांचे आयुष्यमान वाढविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असून देशातील २ हजार गावांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे.

कासारी हे गाव मी दत्तक घेतल्याने या गावाचा सर्वांगीण विकास करणारच आहे, पण प्रत्येक व्यक्तीला आपला गाव आदर्श व्हावा असं जेंव्हा वाटेल तेंव्हाच खऱ्या अर्थाने आदर्श ग्राम ही संकल्पना साकारली जाईल. कासारीचा ७ कोटी ११ लाखांचा ग्रामविकास आराखडा तयार करण्यात आला असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. शिरुरचे तहसिलदार रणजीत भोसले यांनी यावेळी बोलताना सांगितले की या  योजनेतील पात्र कुटुंबांना शासनाच्या वतीने दरवर्षी ५ लाखाचे विमा संरक्षण कवच देण्यात येणार आहे. या योजनेसाठी कासारीतील ७० कुटुंबांचे सर्वेक्षण करून त्यातून निवड करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने शिलाई मशीनकाम प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच आरोग्य शिबिराचेही खासदार शिरोळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी तहसीलदार रणजीत भोसले, गटविकास अधिकारी संदिप जठार, भाजप किसान संघाचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब चव्हाण, सरपंच संभाजी भुजबळ, उपसरपंच शकुंतला रासकर, डॉ. राजेंद्र शिंदे, डॉ. प्रज्ञा घोरपडे, डॉ. जालींदर मारणे, हिरामन जगताप, शेखर घाटपांडे, भगवान रासकर, रावसाहेब काळकुटे, माजी उपसरपंच सुरेश साबळे, दिलीप भुजबळ, अण्णाभाऊ रासकर, हनुमंत नरके, रोहिदास नवले, तबन भुजबळ, रामदास नवले, गोपाळ भुजबळ, जगन्नाथ नरके, ग्रामसेवक चेतन वाव्हळ तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी भुजबळ यांनी केले. तबन भुजबळ यांनी सूत्रसंचालन केले तर गणेश काकडे यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या