आवाज वाढव डि.जे. तुला...

Image may contain: one or more people and outdoorशिरुर, ता. ३ मे २०१८ (प्रतिनीधी) : पुणे जिल्हयात विवाहसमारंभात डिजे साउंडसिस्टिमचा दणदणाट पुन्हा पाहावयास मिळत असुन यावर नियंञण कोणाचे आहे कि नाही असा सवाल व्यक्त केला जात आहे.

गेल्या महिनाभरापासुन लग्नसराई सुरु आहे. या महिनाअखेर सर्वञ लग्नाच्या तारखा हाउसफुल्ल असल्याने लग्नांची एकच धामधुम पाहायला मिळत आहे. पुणे जिल्हयात अनेक महामार्गांवर मोठमोठी मंगलकार्यालये आहेत. या डिजेमुळे ट्रॅफिकचा फज्जा उडत असल्याचे पाहायला मिळत असुन रस्त्यांवर अक्षरश: धांगडधिंगा  सुरु असतो. काही ठिकाणी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होताना मोठ-मोठे साउंड सिस्टिम लावले जात आहेत.

शासनाने डिजे बंदी केल्यानंतर पारंपारिक वाद्यांना लग्नसराइत जोरदार मागणी होत होती. ढोल ताशे यांना चालुलग्नसराईत मागणी असुन डिजेच्या दणदणाटामुळे या वाद्यांना कमी मागणी असल्याचे अनेकांनी बोलताना सांगितले. डिजेच्या दणदणाटात तरुणाई बेभाणपणे नाचत असल्याने अनेकदा वादावादी होत लग्नांना उशीर होत असल्याचे दिसुन येते.  डिजेवर बंदी असुनही अनेक ठिकाणी डिजेचा दणदणाट कोणाच्या आशिर्वादाने सुरु आहे. याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असून असमाधान व्यक्त केले जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या