जामखेड दुहेरी हत्याकांडातील आरोपीस मांडवगणमधून अटक

Image may contain: text
मांडवगण फराटा, ता. ३ मे २०१८ (प्रतिनीधी) : जामखेड दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपीस मांडवगण फराटा परिसरातुन अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

गोविंद दत्ताञय गायकवाड असे  ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत (ता.२८ एप्रिल) रोजी योगेश राळेभात  व अर्जुन राळेभात यांना गावठी पिस्तुलातुन गोळया घालुन ठार मारले होते. या घटनेबाबत जामखेड पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेनंतर जामखेड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर हे समांतर तपास करत असताना आरोपींचा शोध घेत होते. या गुन्हयाचा तपास करत असताना अहमदनगरचे पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार,आरोपी गोविंद गायकवाड हा शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा हद्दीत असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार,सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल पवार,सहायक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, सहायक पोलीस निरीक्षक कैलास देशमाने,पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर गुट्टे, व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने सापळा रचुन आरोपीस ताब्यात घेतले.यावेळी अधिक चौकशी केली असता आरोपीने पुर्व वैमनस्यातुन  विजय आसाराम सावंत (रा.वाकी, ता.जामखेड) व एका  अल्पवयीन मुलास बरोबर घेउन तिघांनी मोटारसायकल वर येउन मयत योगेश व राकेश यांच्यावर गावठी पिस्तुलातुन गोळया घालुन ठार मारल्याचे सांगितले.

सदरची कारवाई अहमदनगरचे पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, श्रीरामपुर चे अपर पोलीस अधिक्षक रोहिदास पवार,कर्जतचे उपविभीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केली.   

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या