कारेगावला पोत्यात आढळला पुरुषाचा मृतदेह

No automatic alt text available.

कारेगाव
,
ता.४ मे २०१८(प्रतिनिधी) :
कारेगाव (ता. शिरुर) येथील फलकेमळ्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पोत्यात बांधलेल्या स्थितीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबाबत रांजणगाव पोलीस स्टेशनला तेजस गणपत फलके यांनी फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ महेश यांचे रांजणगाव एमआयडीसीत जेवणाचे कॅंटिन आहे. कारेगाव हद्दीतील फलकेमळा पठार येथे पडिक जमीन असुन तेथे ते कॅंटिनचा कचरा व वेस्टेज मटेरियल टाकत असतात.

गुरुवार (दि.३) रोजी सकाळी भंगार गोळा करणा-या महिला कचरा टाकलेल्या जमीनीकडे भंगार गोळा करण्यासाठी गेल्या असता त्यांना पांढ-या गोणपाटात प्रेत बांधुन टाकल्याचे व वास येत असल्याचे दिसुन आले.त्यांनीही तत्काळ हि माहिती दिनेश नवले यांना सांगितली. त्यानंतर फिर्यादी यांनी पोलीसांना माहिती देउन पोलीसांसमवेत शेतात जाउन पाहिले असता कच-याच्या ढिगा-यामध्ये एक पांढरे रंगाचे प्रेत आढळुन आले.त्या पोत्याचे तोंड उघडुन पाहिले असता त्यामध्ये अनोळखी पुरुषाचा मृतदेह दोन्ही हात एकञ पाठीवर बांधलेले व दोन्ही पाय एकमेकांना बांधलेले असल्याचे दिसले.तोंडाला स्कार्फ बांधलेला होता व प्रेत फुगलेले होते. सदर प्रेताचे अंदाजे वय २५ ते ३० वर्षे असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यानंतर पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केलेला असून अनोळखी पुरुषाला कोणीतरी अज्ञात कारणावरुन जिवे ठार मारुन पुरावा नाहिसा करण्याच्या उद्देशाने प्रेत पोत्यात बांधुन निर्जनस्थळी टाकुन दिले असल्याने अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या