रांजणगाव सांडसची ग्रामसभा खेळीमेळीत

Image may contain: 11 people, people smiling, people standingरांजणगाव सांडस, ता. ४ मे २०१८ (प्रतिनीधी) : येथिल  कामगार दिन व महाराष्ट्र दिनी होणारी ग्रामसभा (3मे) रोजी खेळीमेळीत पार पडली.

तंटामुक्तीचे विद्यमान अध्यक्ष प्रमोद रणदिवे व उपाध्यक्ष गौतम भोसले यांनी गावातील जेष्ठ व्यक्ती ला संधी मिळावी म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला.गावातील तंटा गाव पातळीवर मिटवले जावे या साठी तंटा न करता गावातील तंटामुक्ती अध्यक्ष निवडला जावा अशी मागणी ग्रामसभा अध्यक्ष संभाजी लोखंडे यांनी यावेळी मांडली. यांच्या या मागणीला नागरिकांनी प्रतिसाद दिला.

अनेक गावांत तंटामुक्ती अध्यक्ष पदा साठी तंटा होऊन अध्यक्ष निवडला जातो परंतु रांजणगावत वेगळा आदर्श या निवडीतून मिळाला.यावेळी पंकज रणदिवे, यांनी अनिल आबा रणदिवे यांच्या नावाची अध्यक्ष म्हणून निवड करावी असे सुचविले तर दीपक रणदिवे,अजित रणदिवे यांनी अनुमोदन दिले तर उपाध्यक्ष पदी अरुण पाटोळे यांची ग्रामसभेत सर्वानुमते निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.

यावेळी उपसरपंच राहुलदादा रणदिवे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद रणदिवे, ग्रामपंचायत सदस्य जयश्री पठारे, सुधीर राक्षे इतर ग्रामपंचायत सदस्य ,पोलिस पाटील भानुदास रोकडे , रमेश निंबाळकर, ओंकार रणदिवे, एकनाथ वसव, दीपक रणदिवे, शरद रणदिवे, दशरथ काळभोर, आबा भडलकर,ग्रामस्थ मोट्या संख्येने उपस्थित होते ग्राम सभा खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली अनेक विषय मंजूर करण्यात आले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या