दुध दराच्या मागण्या मान्य करण्यास सरकारला भाग पाडू

निमोणे, ता. ६ मे २०१८ (प्रतिनीधी) : दुध दराच्या प्रश्नावर शासनाला मागण्या मान्य करण्यास भाग पाडु असे शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार यांनी भुमिका मांडताना सांगितले.

राज्यात सध्या दुधाचे आंदोलन गाजत असुन दुधात लुटता कशाला फुकटच घ्या की अशा  प्रकारचे आंदोलन केले.त्यानंतर राज्यभरात शेतकरी आंदोलन करत आहेत.याच पार्श्वभुीवर त्यांनी www.shirurtaluka.com संकेतस्थळाशी संवाद साधला व भुमिका  स्पष्ट केली.

यावेळी शिरुर तालुका शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नवनाथ गव्हाणे,निमोणेचे शाखाध्यक्ष रोहिदास काळे,प्रकाश दुर्गे  आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या