कारेगावला रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृती

Image may contain: 11 people, people standing and outdoorकारेगाव, ता. ६ मे २०१८ (सतीश डोंगरे) : रांजणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृती करण्यात आली.
Image may contain: 8 people, people standing and outdoor
पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे व पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला.यावेळी वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांबाबत माहिती पञकांचे वाटप करण्यात आले.वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळा, हेल्मेट वापरा,रस्ते अपघातातील जखमींना तातडीने मदत करा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.त्याचबरोबर राञीच्या वेळेस सावधानी साठी अनेक वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्यात आले.

यावेळी रांजणगाव पोलीस स्टेशनचे ए.एस.चव्हान,राजेंद्र वाघमोडे,ए.एस.ठुबे आदी उपस्थित होते.या मोहिमेत कारेगाव ग्रामस्थ,तरुण मोठ्याप्रमाणावर सहभागी झाले होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या