...वधुचे आनंदाचे क्षण टिकले काही काळापुरतेच

Image may contain: 1 personटाकळी हाजी,ता.७ मे २०१८(विशेष प्रतिनीधी) : व-हाडी आले..विवाह थाटात संपन्न झाला..सर्वञ धामधुमीचे वातावरण परंतु अचानक लग्नानंतर काही तासांतच वधुच्या निधनाची बातमी पसरते असा दुर्दैवी प्रकार घडलाय शिरुर तालुक्यातील म्हसे गावात.

सविस्तर असे कि,शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी गावानजीक म्हसे येथे(दि.६) रोजी दुपारी म्हसे  सोसायटीचे माजी चेअरमन बबन रभाजी मुसळे यांच्या हिरामण व दिंगबर या दोन मुलांचा विवाह अक्कलकोट जि सोलापुर येथील सख्या मावसबहीणी असलेल्या जयश्री शिवनिगप्पा कळस गोंडा व विजय लक्ष्मी धर्मन्ना भंगर्गी यांच्या बरोबर आज थाटामाटात म्हसे येथे दुपारी उत्साहात संपन्न झाला.या विवाह सोहळ्यात जयश्री(वय २२) हिचा विवाह हिरामण यांच्या सोबत झाला. अक्कलकोट वरुन आलेल्या आई वडील व पाहुने आनंदाने परतीच्या मार्गाकडे निघाले.दरम्यानच्या काळात अचानक जयश्रीला ताप, चक्कर येऊन त्रास होऊ लागला.यावेळी उपस्थितांनी व ग्रामस्थांनी तातडीने तिला शिरुर ला दवाखान्यांत उपचारासाठी आणले.मात्र उपचारादरम्यान सायंकाळच्या सुमारास जयश्री चे निधन झाले.हि घटना समजताच म्हसे ग्रामस्थ व नातेवाईकांनी गर्दी केली.

राञी उशिरा जयश्री हिचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता  शिरुर येथील ग्रामीण आणला होता.या घटनेनंतर शिरुर तालुक्यात सर्वञ हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या