निमोणेत वनविभागाने केला बिबट्या पिंज-यात जेरबंद

Image may contain: 6 people, including Pradip Sonawane, people smiling, people standing and outdoorनिमोणे, ता. ९ मे २०१८ (तेजस फडके) : निमोणे (ता.शिरूर) येथे गेल्या अनेक दिवसांपासून वावर असलेला बिबटया पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने येथील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात कैद झालेल्या बिबट्याला पाहण्यासाठी निमोणेकरांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती.

निमोणे (ता.शिरूर) येथील परिसरात गेली अनेक दिवसांपासुन बिबट्याचा वावर आहे. अनेक ग्रामस्थांना शेतात तसेच रस्त्यावर अचानक बिबट्या दिसल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते. या परिसरातील शेळ्या तसेच कुत्री यांना बिबटयाने आपलं भक्ष्य बनवलं होत. त्यामुळे परिसरात मोठे दहशतीचे वातावरण होते.त्यामुळे स्थानिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती.

त्यानुसार शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे यांनी त्वरीत हालचाली करून या भागात शनिवार (दि. ५) रोजी विठ्ठल काळे यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला. तीन दिवसांच्या हुलकावणीनंतर चौथ्या दिवशी म्हणजे मंगळवार दि. ८ रोजी पहाटेच्या दरम्यान बिबटया पिंजऱ्यात आलगद जेरबंद झाला. त्यानंतर शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी एस्.एल. गायकवाड, नियत क्षेत्र अधिकारी बी.एम. दहातोंडे, वनकर्मचारी संपत पाचुंदकर व नवनाथ गांधिले यांनी जेरबंद बिबटया ताब्यात घेऊन त्याच्यावर उपचार करून त्याची रवानगी माणिकडोह (जुन्नर) येथे निवारा केंद्रात करण्यात आली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या