पं. भिमसेन जोशींबरोबर गाताना भान हरपून जायचे...

सरदवाडी, ता. १० मे २०१८ (प्रतिनीधी) : पंडित भिमसेन जोशींबरोबर गाताना अनेकदा काळ अन वेळेचेही भान राहत नसायचे.परिस्थितीमुळे मला पुढे जाता आली नाही अशी खंत व्यक्त केलीय ज्येष्ठ गायनाचार्य सिताराम सरोदे यांनी...
पुणे जिल्हयात आजही  सिताराम सरोदे यांच्या गायनापुढे भले भले फिके पडतात.याबाबत बोलताना सरोदे यांनी सांगितले कि, वयाच्या १०व्या वर्षी गायनाची सुरुवात केली.विठ्ठल मेहंदरकर, बुवासाहेब पवार यांच्याकडे काही काळ गायनाचे शिक्षण घेतल्यानंतर पं.हरिश्चंद्र गवारे यांच्याकडे गायन शिकलो.गायनाच्या या आवडीमुळे तालुक्यासह जिल्हयात विविध कार्यक्रम करायचो.त्यातुन थेट भिमसेन जोशी यांच्यासोबत गायनाची संधी मिळाली.त्यांच्यासोबत  सुमारे ४ वर्षे काम करण्याचा योग आला.रियाजाच्या बाबतीत सांगताना,बारा-बारा तास रियाज करायचो.काळ वेळाचे भान कधीच राहत नसायचे.राग गाताना एका  रागातुन चार राग निर्माण व्हायचे अन समोरील रसिक माञ यात अक्षरश: हरखुन जायचे.

कल्याण, पुरया धनाश्री, कौशी कानडा, चंद्रप्रभा, गुणञी, गुजरी तोडी, भोपाल तोडी या रागांमध्ये गाताना वेगळाच अनुभव मिळायचा अशा अनेक आठवणी सरोदे सांगत  होते.

सरोदे यांनी बोलताना, माझे शिष्य सवाई गंधर्व गातात हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट असुन परिस्थितीमुळे मला पुढे जाता आले नाही याची खंत व्यक्त केली. 
 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या