पत्रकाराला दारू पिऊन जिवे मारण्याची धमकी

सादलगाव, ता. 10 मे 2018 (प्रतिनिधी): सादलगाव येथील www.shirurtaluka.com चे पत्रकार संपत कारकूड यांना गावातील अंकुश उर्फ दादा शिंदे (वय 25) याने दारु पिवून शिविगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. संबंधित प्रकार 9 मे 2018 रोजी रात्री 8.45 वाजता घडला असून, पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

सविस्तर माहिती अशी की, संपत कारकूड हे आपल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये बसले होते. रात्री त्यांच्या सेवा केंद्रासमोर येवून तु बाहेर निघ तुझ्याकडे पाहतो. मी दारु पितो तुझा बाप पैसे देतो का? अश्लिल शिव्या देवून जिवे मारण्याची धमकी शिंदेनी दिली. पत्रकाराचे वडील माजी सैनिक असून, त्यांचे वय 82 आहे. यांनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या अंगावर धावून त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांना शिविगाळ केली. 2014-15 मध्ये त्याच्या नावावर तालुका काँग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्षांच्या घरात घुसून शिविगाळ व मारहाण केल्याचा गुन्हयासह विविध गुन्हे दाखल आहे.

गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता...
कोणताही कायदा हातात न घेता घडलेल्या घटनेची तत्काळ तक्रार देण्यासाठी पत्रकार संपत कारकूड हे रात्री 9 वाजता मांडवगण फराटा पोलिस स्टेशनला गेले होते. यावेळी पोलिस स्टेशन बंद होते. येथील जमादार श्री. जगदाळे यांना फोन करुन तक्रार देण्यासाठी आलो आहे. माझी तक्रार घ्या ! घडलेल्या घटनेविषयी सविस्तर सांगून दारु पिणारा व्यक्ती अद्यापही माझ्या घरासमोर मला व कुटुंबाला शिविगाळ करतो आहे. आपण त्वरित चला. परंतु, पोलिसांनी मात्र ही घटना गंभीरतेने घेतली नाही. अशा स्वरुपाच्या गुन्हयामध्ये पोलिस कोणतीच कारवाई करत नसल्यामुळे दारु पिण्याऱयांकडून गावातील सामान्य नांगरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पोलिस संख्या कमी असल्याचे कारण देवून येथील पोलिस यंत्रणा वेळ मारुन नेत आहे. गुन्हयांकडे लक्ष देत नसल्यामुळे सादलगाव येथे एखादा गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकारणांमध्ये कायद्याचा वचक नसल्यामुळे रोज असे प्रकार घडत असून, नागरिक आता पोलिस स्टेशन नेमके कशासाठी? असा सवाल उपस्थित होत आहे.

प्रतिबंधात्मक कारवाई करणार...
शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक राजेंद्र कुंटे यांच्याशी संपर्क साधला असता, प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया कुंटे यांनी दिली.

तुमचा काय अनुभव...
एखादी व्यक्ती तक्रार देण्यासाठी घटनास्थळी गेल्यानंतर चौकी बंद असणे, पोलिस कर्मचाऱयांची संख्येअभावी घटनास्थळी न जाणे? यांसह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत तुमचा काय अनुभव आहे, याविषयी प्रतिक्रियांच्या माध्यमातून अथवा shirurtaluka@gmail.com वर जरूर लिहा.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या