कारेगावमध्ये मृतदेहाचा फ्लेक्‍स वेधून घेतोय लक्ष

No automatic alt text available.
कारेगाव, ता. 11 मे 2018: कारेगाव (ता. शिरुर) येथील फलकेमळ्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पोत्यात बांधलेल्या स्थितीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती, अद्यापही या मृतदेहाची ओळख न पटल्याने पोलिसांनी चौकात फ्लेक्स लावला असून, अनकांचे याकडे लक्ष वेधले जात आहे.

कारेगाव येथे औद्योगिक वसाहतीमुळे अनेक परप्रांतीय कामगार राहतात. त्यामुळे लक्ष वेधून घेणारा हा फ्लेक्‍स या खुनाच्या शोधात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावेल, असा आशावाद कारेगाव औद्योगिक वसाहतीतील पोलिसांना आहे. रांजणगाव औद्योगिक पोलिसांनी अनोळखी मृतदेहाची ओळख पटावी व खुनाचा लवकरात लवकर शोध लागावा, यासाठी पुणे-नगर रस्त्यावर कारेगाव (ता. शिरूर) येथे फ्लेक्‍स लावण्यात आला आहे. या प्लेक्सकडे अनेकांचे लक्ष जात आहे.

सहा दिवसानंतरही मृतदेहाची ओळख पटत नसल्याने व खुनाचाही उलगडा होत नसल्याने पोलिसांनी कारेगाव येथील चौकात सर्व माहितीसह फ्लेक्‍स लावला आहे. कुजलेल्या अवस्थेतील त्या मृतदेहाची ओळख पटविणे शक्‍य नव्हते. त्यामुळे हा मृतदेह कोणाकडे सोपवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मृतदहाची ओळख पटविण्यासाठी नागरिकांनी याबाबत सहकार्य केल्यास त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे रांजणगाव औद्योगिक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी सांगितले.

कारेगावला पोत्यात आढळला पुरुषाचा मृतदेह

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या