पत्रकार धमकी प्रकरणाची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे

सादलगाव, ता. 11 मे 2018: सादलगाव (ता. शिरूर, पुणे) येथील www.shirurtaluka.com चे पत्रकार संपत कारकूड यांना जीवे मारण्याची धमकीची तक्रार देवून दोन दिवस उलटले तरी अद्याप कायदेशीर कारवाई न झाल्यामुळे याबद्दलची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाची निश्क्रियाता आता चव्हाटयावर आली आहे.

तिन पोलिस आणि तेरा गावे अशी परिस्थिती असलेल्या मांडवगण फराटा पोलिस स्टेशनच्या कारभाराचे तिन तेरा वाजले आहेत. चौकीला एकदा कुलप लावले की ते केंव्हा उघडले याची खात्री दस्तुरखुदद शिरुर पोलिस प्रमुख अधिकाऱयांनाही देता येत नाही. तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या सामान्य नागरिकांना ताटकळत बसावे लागत आहे. कधीकधी तर संपर्ण चौकी दिवसभर बंद असल्याचा अनुभव येथील नागरिकांना येत आहे.

सामान्य गुन्हयांतील तक्रारी प्रकारांना वेळ देण्यासाठी पोलिसांकडे वेळच नाही. अशा परिस्थितीतूनच गंभीर गुन्हयांचा जन्म होत असून, गावोगावी कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिस प्रशासन येथील नियोजन हातळताना कमी पडत आहे. याबद्दलची जाणीव असतानाही यावर कोणताही तोडगा काढला जात नाही. पोलिस प्रशासन तत्काळ कारवाई करत नसल्यामुळे सामान्य हतबल झाल्याचे चित्र पुर्व भागातील मांडवगण फराटा पोलिस चैकीच्या परिसरात दिसून येत आहे. याबाबत नेटिझन्सनी सोशल मिडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांकडून निषेध

महाराष्ट्र राज्य शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष शिंदे, तालुका संपर्क प्रमुख तेजस फडके, अर्जुन बढे, बबनराव वाघमारे,  अभिजीत आंबेकर आणि सतीश केदारी यांनी या घटनेचा तिव्र निषेध व्यक्त केला असून, धमकी प्रकरणी आरोपीवर तत्काळ कारवाईचे निवेदन दिले आहे. मात्र, पोलिस प्रशासनाला कारवाईसाठी अद्याप वेळ मिळालेला नाही. पोलिस केंव्हा कारवाई करणार की करणारच नाहीत, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

संपर्कः संपत कारकूड- 9823561922

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या