...अन पोलीस निरीक्षकांनी स्वत:च विझवली आग

Image may contain: one or more people, night and outdoorकरडे,ता.१२ मे २०१८(प्रतिनीधी) : राञीची वेळ...रस्त्याच्या कडेला वनवा पेटलाय...धग वाढतेय...तितक्यात रस्त्याने जाणा-या पोलीस निरीक्षकांनी स्वत:च आग विझवण्याचा प्रयत्न केला...त्यानंतर काही तरुणही मदतीला धावतायेत असं चिञ पहायला मिळालं करडे घाटात...
Image may contain: 1 person, standing and outdoor
सविस्तर असे कि, शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे हे करडे  घाटातुन राञीच्या वेळेस प्रवास करत असताना घाटानजीक मोठा वनवा पेटलेला दिसला.त्या वनव्यात रस्त्याच्या कडेला असणारी झाडे खाक होत  असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.यावेळी त्यांनी तत्काळ गाडी थांबवुन कर्मचा-यासह स्वत: आग विझवण्याचा प्रयत्न केला.परंतु आगीची धग मोठी असल्याने आग लवकर विझतच नव्हती.त्याच दरम्यान करडे येथील युवक बंटी घायतडक संतोष पोपळघट, हेमंत घायतडक हे रस्त्याने जात  होते.त्यांनी तत्काळ धाव घेउन आग विझवण्याचा प्रयत्न केला.यावेळी काही अंतरावर एका घरी जाउन पाणी मागवुन आणल्यानंतर अखेर आग आटोक्यात यश आले. 

Image may contain: 1 person, standing and outdoor
शिरुर-चौफुला मार्गावर करडे घाटाजवळ प्रचंड उन्हाळ्यात सावली देणारे अनेक महाकाय वृक्ष आहे.या ठिकाणी येणारे जाणारे उन्हाळ्याच्या दिवसांत याच ठिकाणी दुपारच्या उन्हात विसावा घेतल्याशिवाय अनेकदा पुढे जातच नाही.परंतु गेल्या काही वर्षात विविध कारणांनी हे वृक्ष नामशेष होत असुन मोजकेच वृक्ष सध्याच्या उन्हाळयात बहरले असुन प्रवाश्यांना उन्हाच्या काहिलीत सावली देण्याचा प्रयत्न करत आहे.शिरुर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी स्वत:च दाखविलेल्या तत्परतेचे करडेकरांनी कौतुक केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या