उमेदवारी अर्ज दाखल करायला उमेदवारांची धांदल

Image may contain: textशिरुर, ता. १२ मे २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या होणा-या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारिख असल्याने उमेदवारांची धांदल पहायला मिळणार आहे.

शिरूर तालुक्यातील अण्णापूर, कर्डेलवाडी, तर्डोबाचीवाडी, सरदवाडी, शिरूर ग्रामीण या पंचक्रोशीतील पाच ग्रामपंचायातीसह तालुक्यातील वाजेवाडी या ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडत आहे. शिरूर  शहरासाठी महत्वच्या असणाऱ्या शिरूर पंचक्रोशीतील पाच ग्रामपंचायतीसह सहा ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असुन अर्ज दाखल करताना एकच धावपळ होताना दिसत असुन आज किती उमेदवार अर्ज दाखल करणार याची उत्सुकता लागुन आहे.

सध्या शिरूर पंचक्रोशीतील सर्वच ग्रामपंचायतींवर आमदार पाचर्णे यांचे वर्चस्व आहे.त्यामुळे या निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.१४ मे रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे.१६ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघे घेण्याची मुदत आहे.२७ मे रोजी मतदान होणार असून २८ मे रोजी शिरूर तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या