बेकायदा सावकारीप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल

No automatic alt text available.शिक्रापूर, ता.१३ मे २०१८(प्रतिनीधी) : बेकायदा सावकारीप्रकरणी शिक्रापुर पोलीस स्टेशनला दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणी नवनाथ मुकुट गवारे (वय 40, रा.विठ्ठलवाडी, ता. शिरूर) याला अटक करण्यात आली असून, ग्रामविकास अधिकारी गंगाराम शेलार हा फरारी झाला आहे.नवनाथ गवारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रकाश किसन मांढरे (वय 40, रा. शिक्रापूर) व त्यांची पत्नी रोहिणी मांढरे (वय 36) हे आठ दिवसांपासून उपोषणास बसले होते. त्यांच्याकडे गवारेविरोधात लेखी पुरावा नसला, तरी त्यांच्यासोबत झालेले मोबाईल संभाषण उपलब्ध आहे. त्या आधारे बेकायदा सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गवारे याने 6 लाख 10 हजारांच्या रकमेवर 5 टक्के व्याज लावून मूळ मालमत्तेचे खरेदीखत पालटून देण्यासाठी 19 लाखांची मागणी करून मांढरे कुटुंबाला त्रास देणे सुरू केले होते. त्याच्या त्रासाला कंटाळून मांढरे दांपत्य उपोषणाला बसले होते. त्यांच्या आंदोलनाची दखल घेत पोलिसांनी गवारेला अटक केली.

सणसवाडी येथील वाहतूक व्यावसायिक चंद्रकांत लिंबराज गंभिरे (वय 28, रा. सणसवाडी, ता. शिरूर) हे घर विकण्यासाठी आठ अ चा उतारा आणण्यासाठी सणसवाडी ग्रामपंचायतीत गेले असता त्यांना उतारा न देता शेलारने त्यांना व्याजाने रक्कम दिली. नंतर पाच व दहा टक्के व्याज आकारून वसुलीचा तगादा लावला. मूळ रक्कम व एक लाख रुपये व्याजापोटी देऊनही आणखी 74 हजार रुपये मागणाऱ्या शेलारच्या विरोधात पोलिसांनी बेकायदा सावकारकीचा गुन्हा दाखल केला.

शिरुर तालुक्यात सावकारीचा पाश घट्ट होत असुन अनेक सावकारांकडुन शोषण होण्याच्या घटना घडत असुन भितीपोटी नागरिक माञ तक्रार द्यायला पुढे येत नाहीत.शिरुर तालुक्यात प्रथमच पोलीसांनी गुन्हा दाखल केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या