बो-हाडेमळ्यात घरात घुसुन एक लाखांचा ऐवज लंपास

No automatic alt text available.शिरुर, ता. १४ मे २०१८ (प्रतिनीधी) : बो-हाडेमळा (ता.शिरुर) येथे अज्ञात चोरट्यांनी घरात घुसुन सुमारे एक लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली.

या प्रकरणी मच्छिंद्र कुंडलिक गो-हे(वय.२७,रा.बो-हाडेमळा) यांनी फिर्याद दिली आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गो-हे हे कुटुंबासह बो-हाडेमळा येथे राहत असुन शनिवार(दि.१२) रोजी हे कुटुंबासह राञी जेवण केले.घराचे बांधकाम नवीन केल्याने घरात लाइट नव्हती.त्यामुळे घरातील सर्वजण घरासमोरील आवारात झोपले होते.व फिर्यादीचे वडील हे अंगणातील गोठ्यासमोर झोपले होते.त्यामुळे घराचा दरवाजा उघडा होता.रविवार(दि.१३) रोजी मध्यराञी दिडच्या सुमारास फिर्यादीच्या दुचाकीचा काहीतरी आवाज आल्याने फिर्यादीचे वडील हे जागे झाले.व त्यांनी आरडाओरडा करुन कुटुंबातील सर्व सदस्यांना उठविले.त्यावेळी फिर्यादी मच्छिंद्र यांना वडिलांनी सांगितले कि, चार अनोळखी चोरटे दुचाकीजवळ काही तरी करत होते.व ओरडल्यानंतर सर्व चोरटे पळुन गेल्याचे सांगितले.यानंतर सर्वांनी घरात जाउन पाहणी केली असता,६२ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण २५ ग्रॅम,२१ हजार २५० रुपये किंमतीचे साड़ेआठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील वेल,रोख रक्कम २५ हजार असे एकुण मिळुन १ लाख ८हजार सातशे पन्नास रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरी केला.

यानंतर फिर्यादी यांनी शिरुर पोलीस स्टेशन ला धाव घेउन अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास उमेश भगत हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या