आंधळगावात टेंपो-कंटेनरच्या धडकेत चालक गंभीर

Image may contain: one or more people, people standing and outdoorआंधळगाव, ता. १४ मे २०१८ (प्रतिनीधी) : आंधळगाव जवळ मालवाहू टेंपो व कंटेनरच्या धडकेत चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आंधळगाव जवळ मालवाहु टेंपो व कंटेनर यांची उर्जा डेअरी नजीक समोरासमोर धडक झाली. यात एकटाच असलेला टेंपोचालक डोक्याला मार लागुन गंभीर जखमी झाला.अपघाताची आवाज येताच स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव  घेउन अपघातातील जखमीला बाहेर काढुन  उपचारांसाठी दाखल केले.यानंतर शिरुर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेउन माहिती घेतली.

या अपघातातील गंभीर जखमी चालकाचे माञ उशिरापर्यंत नाव समजू शकले नाही. या घटनेचा पुढील तपास शिरुर पोलीस करत आहेत.  

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या