शिक्रापुरातील पोलिसाचा संशयास्पद मृत्यू? (Video)

Image may contain: one or more people and people sitting
Image may contain: 1 person, closeupशिक्रापूर, ता. 14 मे  2018 (प्रतिनिधी): येथील पोलिस स्टेशनमधील पोलिस नाईक प्रल्हाद शंकर सातपूते (वय 47) यांचा सोमवारी (ता. 14) संशयास्पद मृत्यू झाला असून, शिरुर तालुक्यासह पुणे जिल्हयात खळबळ उडाली आहे. शिक्रापूरजवळील पिंपळे खालसा येथील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला आहे.

याबाबत शिक्रापूर पोलिस व पिंपळे खालसा ग्रामस्थांनी माहिती दिली की, आज (सोमवार) सकाळी सातच्या सुमारास पिंपळे खालसा येथील रस्त्याच्या कडेला एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत एका पोलिसाचा मृतदेह आढळल्याचे माहिती स्थानिकांनी शिक्रापूर पोलिसांना दिली. शिक्रापूर पोलिस घटनास्थळी दाखल होताच मृतदेह हा पोलिस नाईक प्रल्हाद सातपुते यांचा असल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक पाहणीत त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या झाल्याचे दिसून येत होते. मात्र, डोक्‍याला आणि गुडघ्याला रक्ताळलेली जखम, गळफास घेण्यासाठी पायाखालचे जमिनीचे असलेले कमी अंतर, सोन्याची अंगठी गायब होणे, मृत्यूपूर्वी मृतदेहाची न झालेली धडपड पाहता, ही आत्महत्या नसल्याबाबत चर्चा आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे. सातपुते यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदनपुण्यात ससूनमध्ये करण्यात आले. ससून प्रशासनाने शवविच्छेदनाचा कुठलाच प्राथमिक अहवाल न देता "व्हिसेरा' राखून ठेवला असल्याने मृत्यूबाबतचे गुढ वाढले आहे.दरम्यान, सातपुते हे रविवारी सकाळी साडेदहा वाजता शिक्रापूर पोलिस स्टेशनला येऊन गेले होते. पुढे दुपारी बारानंतर त्यांच्या मोबाईल बंद झाला व सोमवारी सकाळी त्यांची बुलेट गाडी व जवळच्या झाडाला लटकलेला त्यांचा मृतदेह स्थानिकांना दिसला. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांना याबाबत माहिती कळविण्यात आली.

सोमवारी संध्याकाळी सातपुते यांचा मृतदेह ससून रुग्णालयातून सातपूते कुटुंबीयांनी ताब्यात घेतला आणि मुळगाव राजेगाव (ता. दौंड) येथे अंत्यविधीसाठी नेण्यात आला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या