...त्या पोलीसाची अकाली 'एक्झिट' चटका लावणारी

Image may contain: 1 person, closeupमांडवगण फराटा,ता.१४ मे २०१८(प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यात चांगली सेवा बजावलेल्या प्रल्हाद सातपुते यांची अकाली 'एक्झिट' सर्वांना चटका लावुन गेली असुन तालुका चांगल्या अधिका-याला मुकला असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

शिक्रापुर(ता.शिरुर) येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी प्रल्हाद सातपुते यांनी  आत्महत्या केल्याचे वृत्त शिरुर तालुक्यासह  पुणे जिल्हयात पसरताच सर्वञ एकच खळबळ उडाली.प्रल्हाद सातपुते यांनी ठाणे,मुंबई या ठिकाणी नोकरी केल्यानंतर शिरुर तालुक्यात पहिल्यांदा  पोस्टिंग झाले ते  मांडवगण फराटा पोलीस चौकीवर.या ठिकाणी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी कामाचा चांगला ठसा उमटविला.त्यापुर्वी त्यामुळे तेथील कामाचा चांगला अनुभव पाठीशी असल्याने या ठिकाणी त्यांनी काम करण्यास सुरुवात केली.मांडवगण फराटा या ठिकाणी रुजु झाल्यानंतर या परिसरात प्रामुख्याने अवैध दारुधंदे,जुगार,मटका यांबरोबर रोडरोमिओ यांना हिसका दाखवत चांगला दबदबा निर्माण केला होता.

या ठिकाणी त्यांचे वर्तन नेहमी संयमी असायचे.त्यामुळे ग्रामस्थांमध्ये चांगला अधिकारी म्हणुन त्यांची परिसरात ख्याती होती.ते कुटुंबासह काही दिवस मांडवगण फराटा येथे स्थायिक होते.त्यामुळे राञी कितीही अडी-अडचणी आल्या तरी ग्रामस्थांना नेहमी ते उपलब्ध असायचे.तरुण असो कि वयोवृद्ध अशा सर्वांमध्ये ते लोकप्रिय होते.त्यानंतर शिरुर येथे बदली झाली.तेथेही त्यांनी चांगले काम करत अनेक गुन्हेगारांना जेरबंद करण्यात यश मिळविले होते.या ठिकाणी कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर शिक्रापुर पोलीस स्टेशनला त्यांना रुजु करण्यात आले होते.त्या ठिकाणी त्यांनी दंगलीच्या काळात चांगल्या कामाचा ठसा उमटविला होता.तसेच काही दिवसांपुर्वी चोरीच्या व अन्य गुन्हयात महत्वाचे आरोपींना धाडसाने अटक करण्यात मोलाची भुमिका बजावली होती.

सोमवार(दि.१४) रोजी सकाळी आत्महत्येचे वृत्त मांडवगण फराटा परिसरासह  तालुक्यात पसरल्यानंतर एकच खळबळ उडाली.परिसरात अनेकांनी चांगला अधिकारी गमावला असल्याच्या भावना व्यक्त केल्या तर ज्या सहका-यांसमवेत शिरुर तालुक्यात काम केले त्या अधिका-यांनीही,' कितीही कठीण प्रसंग असला तरी न घाबरता सामोरे जाणारा एकमेव अधिकारी होता व या घटनेवर विश्वासच बसत नाहीये' अशा प्रकारच्या भावना ग्रामस्थांनी मांडल्या.मांडवगण फराटा येथील पोलीस चौकीत काम करताना सातपुते  यांनी इतका वचक निर्माण केला होता की गणवेषातील पोलीस दिसला कि भल्या भल्यांची भांबेरी उडायची.परंतु त्यांच्या निधनाने फक्त चांगल्या व कर्तव्यदक्ष अधिका-याच्या केवळ आठवणीच उरल्या असुन सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या