तळेगाव ढमढेरे–न्हावरे रस्त्याची डागडुजी सुरू

Image may contain: one or more people, people standing, sky, tree and outdoor
तळेगाव ढमढेरे
, ता.१५ मे २०१८ (प्रा.एन.बी.मुल्ला) :
तळेगाव ढमढेरे – न्हावरे रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.खड्डे बुजवून डागडुजी करण्यात येत आहे.

मात्र ठिकठिकाणी रस्ता खचलेला असल्याने व तुटलेल्या सार्इडपटयामुळे ही कामचलावू डागडूजी तग धरण्याची साशंकता असल्याने या रस्त्याचे नुतनीकरण होण्याची आवश्यकता असल्याचे मत परीसरातील नागरीकांनी व्यक्त केले आहे.तळेगाव ढमढेरे–न्हावरे रस्त्याची दुरावस्था झाली होती.ठिकठिकाणी खड्डे पडल्याने व रस्ता खचल्याने या 27 किमी अंतर असलेल्या रस्त्यावरून वाहतुक करणे जिकीरीचे झाले होते.या रस्त्यावर दुचाकीस्वारांनाही कसरत करावी लागत होती.

तळेगाव ढमढेरे–न्हावरे रस्त्याची दुरवस्था झाल्याबाबतचे वॄत्त संकेतस्थळाने वारंवार प्रसिध्द केले होते.या वॄत्ताची दखल घेउन रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.खडी व डांबर वापरून खड्डे पडलेल्या ठिकाणी मलमपट्टी करण्यात येत आहे.लवकरच पावसाळा सुरू होणार असल्याने या डागडुजीचा कांही उपयोग होर्इल असे वाटत नाही.त्यामुळे थोडयाच दिवसात रस्त्याची अवस्था जैसे थे होण्याची चिन्हे दिसत आहेत.रस्त्याची ही तात्पुरती डागडुजी असल्याने रस्त्याचे नुतनीकरण करून  तुटलेल्या सार्इडपट्टयाही भरण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.मात्र त्पुरती का असेना डागडुजी होत असल्याने परीसरातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या