पुर्व भागात वाळू सम्राटांचं चांगलंच फावतयं... (Video)

Image may contain: grass, outdoor and natureनिमोणे , ता. १५ मे २०१८ (तेजस फडके) :  शिरुर तालुक्यातील घोड, भीमा तसेच वेळ या नद्यांच्या पात्रात विविध ठिकाणी वाळू उपसा चालू असून महसुल विभागाने आत्तापर्यंत अनेकवेळा धाडी टाकुनही "वाळू सम्राटांना" काहीच फरक पडला नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे नदीपात्रांची मात्र अक्षरशः चाळण झाली आहे.

शिरुरच्या पूर्व भागात निमोणे, चिंचणी,इनामगाव या ठिकाणच्या नदीपात्रातून मोठया प्रमाणात वाळुचोरी चालु असुन वाळूचोर हे मुजोर झाले आहेत. निमोणे येथील पिंपळाची वाडी येथुन घोड नदीच्या पात्रातून बोटींच्या साह्याने दिवसरात्र वाळुउपसा चालु असुन हि वाळु नदीच्या कडेला साठवुन रात्रीच्या वेळेस वाहतुक केली जात आहे. त्यामुळे येथील रत्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.


निमोणे-करडे रत्यांची वाळू वाहतुकीमुळे अतिशय वाईट अवस्था झाली असुन या रस्त्याने जाताना वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.तसेच रात्रीच्या वेळेस येथुन चोरटी वाळु वाहतुक चालत असल्याने औद्योगिक वसाहतीत कामाला जाणाऱ्या कामगारांना याचा त्रास होत आहे. ह्या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत.तसेच रस्त्याच्या कडेला दुतर्फा काटेरी झाड असल्याने वाळू वाहतुक करणाऱ्या ट्रक रस्त्याच्या खाली उतरत नाहीत त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते.या रस्त्यावर अनेकवेळा गंभीर अपघात ही झालेले आहेत.त्यामुळे चोरटी वाळु वाहतुक बंद करावी अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या