पत्रकार धमकीप्रकरणी पोलिसांची कारवाई सुरू

सादलगाव, ता. 15 मे 2018 (प्रतिनिधी): पत्रकार धमकीप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू केली आहे. पोलिस गावात दोन वेळा गेले. परंतु, आरोपी पसार झाला असून त्याचा पुढील तपास करत आहेत.

धमकी आणि बेकायदेशीर हत्यार बाळगून दहशत पसरविणे असे दोन वेगवेगळे गुन्हे याप्रकरणी दाखल झालेले आहेत. पोलिसांनी आरोपीच्या घरी दोनवेळा चक्कर मारली. परंतु, आरोपी सापडले नाहीत. धमकीच्या दोन घटना एकापाठोपाठ घडल्यामुळे या घटनेमागे राजकिय शडयंत्र असल्याचे बोलले जात आहे. आरोपींना दारु पाजून संबंधित प्रकार घडविण्यापाठीमागे कोणाचा हात आहे का? असेल तर ते कोण आहेत. गुन्हा करण्यासाठी आरोपींना कोणी प्रवृत्त केले? आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्या जबाबामध्ये समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या घटनेमुळे गावामध्ये दारु पिवून धिंगाणा घालणाऱया प्रवृत्तीवर कोणताच धाक नसल्यामुळे सामान्य नागरिकांना नाहक मोठया त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गावातील वातावरण दुषित करुन दारु पिणाऱया व्यक्तीला हाताशी धरुन कायद्याचा दुरुपयोग करण्याचा अयशस्वी प्रयत्न घडला असल्याचे समोर येत असून, पत्रकाराने दाखविलेल्या स्वयंमी भुमिकेमुळे कोणतीही वाईट घटना घडलेली नाही.

पत्रकार धमकीप्रकरणी आणखी एकावर गुन्हा
सादलगाव येथील पत्रकार संपत कारकूड यांना धमकी प्रकरणी बेकायदेशीर हात्यार बाळगून दहशत निर्माण केल्याबददल गावातच राहणार अमर बाळासाहेब जगताप यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 9 मे रोजी रात्री दारु प्यायल्यानंतर शिविगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्यानंतर दुसऱयाच दिवशी धारदार तलावरसदृश्य हत्यार घेवून पत्रकाराच्या घराभोवती संशयास्पद घिरटया घालताना हटकले असता अमर जगताप याच्या हातामध्ये लोखंडी धार लावलेले हत्यार दिसले. तत्काळ त्याच्याकडून हत्यार ताब्यात घेवून पोलिसांकडे जावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीवर आयपीसी 504,505,506 नुसार गुन्हा रजिस्ट्र क्रमांक 100/18 दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेला आरोपी पहिल्या आरोपीचा नातेवाईक असल्याचे समोर आले आहे.

कटकारस्थान करुनच धमकी

पत्रकाराला अडचणीत आणण्यासाठी तसेच पत्रकार कशामध्येच सापडत नाही म्हणून मागासवर्गीय तरुणांना दारु पाजून त्यांच्याद्वारे पत्रकारावर हल्ला करुन पत्रकाराला अद्दल घडविण्यासाठी वरील घटना घडविण्यात आली आहे. हा सर्व प्रकार म्हणजे कट-कारस्थान असल्याचा संशय पत्रकार संपत कारकूड यांनी व्यक्त केला असून धमकीप्रकरणी पडद्यापाठीमागे मोठे राजकारण शिजले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गावामध्ये बहुजन समाजामध्ये जातीअंतर्गत तेढ निर्माण करुन आपआपसामध्ये भांडणे लावून आपला राजकिय डाव साधण्याचा कुटील डाव रचलेला होता. परंतु तो त्यांच्याच अंगावर आला आहे.

आरोपीचे गावातून पलायन
गुन्हा घडल्यानंतर दोन्ही आरोपींनी गावातून पलायन केले असून, अद्याप कोणताच आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आरोपी ताब्यात घेतल्यानंतर हल्ल्याप्रकरणी नेमका कोणाचा हात आहे का? हल्ला का करण्यात आला? हल्ल्यामागे नेमके सुत्रधार कोण आहे? इत्यादी बाबी उघड होणार असून या विषयाची सध्या गावभर दबक्या आवाजात चर्चा चालू आहे.

कारकूड यांना पाठिंबा...
www.shirurtaluka.comचे पत्रकार संपत कारकूड यांना जिवे मारण्याची धमकी दिल्यानंतर महाराष्ट्र राज्य शिरूर तालुका पत्रकार संघाने शिरूर पोलिस स्टेशनमध्ये निवेदन देऊन पाठिंबा दिला आहे. शिवाय, या प्रकरणाची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. शिरूरचे पोलिस निरिक्षक राजेंद्र कुंटे यांनही दखल घेत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या