निमोणे-करडे रस्त्यावर खड्डेच खड्डे

Image may contain: plant, tree, sky, outdoor and natureनिमोणे, ता. १६ मे २०१८ (तेजस फडके) : निमोणे-करडे रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठया प्रमाणात खड्डे पडले असुन हा रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला आहे.

निमोणे-करडे हा अंदाजे १० किमी चा रस्ता असुन या रस्त्यावरून अवैध वाळु वाहतुक, ऊस वाहतुक मोठया प्रमाणात चालते.तसेच औद्योगिक वसाहतीत काम करणारे अनेक कामगार या रस्त्यावरून ये-जा करत असतात.अनेक वेळा रात्री खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेकजण या रस्त्यावर गंभीर अपघात होऊन जखमी झालेले आहेत.तसेच या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या काटेरी झाडांमुळे वाहनचालक ओव्हरटेक करण्याच्या नादात काटेरी झुडपात अडकुन पडले आहेत.त्यामुळे पावसाळ्यापुर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.

याबाबत शिरुरचे बांधकाम विभागाचे उपअभियंता एच आर चौघुले यांच्याकडे अधिक चौकशी केली असता. त्यांनी सांगितले की, या बजेट मध्ये या रस्त्याच्या दुरुस्तीवर निधी मंजुर झालेला नसल्याने या रस्त्याचं दुरुस्तीच काम करण्यात अडचणी येत आहेत.या रस्त्याच्या कामास शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यास तात्काळ या रस्त्याचे काम सुरु करण्यात येईल. सध्या पावसाळा सुरु होण्याआधी मुरुम टाकुन तात्पुरते खड्डे बुजविण्यात येणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या