कासारीच्या विकासासाठी कटीबध्द : खासदार अनिल शिरोळे

Image may contain: 3 people, people standing and outdoorकासारी, ता.१६ मे २०१८ (प्रा. एन. बी. मुल्ला) : सांसद आदर्श ग्राम कासारीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन खासदार अनिल शिरोळे यांनी केले.

कासारी(ता.शिरूर) येथे 1 कोटी 5 लाख रूपये निधीतून होणा-या विविध विकास कामांचे उद्घाटन खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात खासदार अनिल शिरोळे बोलत होते.यावेळी मोफत आरोग्य शिबिर व शासन आपल्या दारी कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना खासदार शिरोळे म्हणाले की गावातील विविध विकाासकामे करण्यासाठी शासनाच्या विविध योजनातून व खासदार निधीतून आवश्यक तितका निधी पुरविण्याचा प्रयत्न केला जार्इल असेही त्यांनी यावेळी सांगीतले.या कार्यक्रमात कासारी, माळवाडी व नरकेवाडी येथील बंदिस्त गटार बांधणे तसेच अन्य विविध विकास कामांचे भुमिपूजन खासदार शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास शिरूर पंचायत समितीच्या सदस्या जयमाला जकाते, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, कासारीचे सरपंच संभाजी भुजबळ, भाजपचे तालुका सरचिटणीस पंडाभाउ गायकवाड, बाबासाहेब चव्हाण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष संभाजी गवारे, समता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र ढमढेरे, माजी पंचायत समिती सदस्य अरूण भुजबळ, राजेंद्र काकडे, रावसाहेब काळकुटे, उपसरपंच शकुंतला रासकर, अण्णासाहेब रासकर, सुखदेव भुजबळ, अशोक रासकर, माजी सरपंच गुलाब सातपुते, सुनिता तोडकर, साळुबार्इ नरके, हनुमंत नरके, सुरेश साबळे, रोहीदास नवले आदी मान्यवर तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

गावातील विकास कामे करताना राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकजूटीने कामाला लागणे आवश्यक असल्याचे मत यावेळी बोलताना आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी भुजबळ यांनी केले.तबन भुजबळ यांनी सुत्रसंचालन केले तर अनिल नवले यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या