शिरसगावमध्ये प्राध्यपकाची गळफास घेऊन आत्महत्या

No automatic alt text available.शिरसगाव काटा, ता.१६ मे २०१८(प्रतिनीधी) : शिरसगाव काटा (ता.शिरुर) येथे एकाने गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना बुधवार(दि.१६) रोजी सकाळी उघडकिस आली.

बाळकृष्ण धारबापु कोळपे(वय.४७ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.याबाबत आण्णासो यशवंत कोळपे यांनी फिर्याद दिली आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी आण्णासो कोळपे हे बुधवारी सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना बायसाबाई कोळपे यांनी फिर्यादीस, घराच्या टेरेसवर गेले असताना दिर बाळकृष्ण यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला असल्याचे दिसुन आल्याचे सांगितले.त्यावेळी फिर्यादी यांनी शेताच्या कडेला लिंबाच्या झाडाजवळ जाउन पाहिले असता,बाळकृष्ण यांनी ओढणीच्या साहाय्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे दिसले.

बाळकृष्ण हा विद्या प्रतिष्ठान,बारामती येथे कॉलेजवर प्राध्यापक म्हणुन नोकरी करत होता.तेथेच पत्नी व एक मुलगा यांच्यासह राहत होते.सध्या कॉलेजला सुट्टी असल्यामुळे गावी आले होते.त्यांना पोटदुखीचा ञास होता.दोन दिवसांपुर्वी हंगेवाडी(ता.श्रीगोंदा) येथे उपचार घेतले होते. त्यानंतर पुण्यात उपचार घेण्यासाठी जाणार होते.त्यामुळे पोटदुखीच्या ञासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे.या घटनेचा पुढील तपास मांडवगण पोलीस चौकीचे पोलीस हवालदार आबासो जगदाळे हे करत आहेत.

मयत बाळकृष्ण हे शिरुर पंचायत समितीचे माजी सभापती, माजी जि.प. सदस्य दादासो कोळपे यांचे बंधू होत. निधनाचे वृत्त कळताच शिरसगाव काटा व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या