शिरुर शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामांचे भुमिपुजन

Image may contain: 4 people, people smiling, people standing and outdoorशिरुर,ता.१७ मे २०१८(प्रतिनीधी) : शिरुर नगरपालिकेच्या बांधकाम विभागातर्फे अंतर्गत रस्त्यांचे भुमिपुजन सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांच्याहस्ते नुकतेच करण्यात आले.

शिरुर नगरपालिकेच्या बांधकाम विभागातर्फे शहरातील सुरजनगर येथील  १९ लाख ३० हजार ६४८ रुपये किंमतीच्या अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करणे, रेव्हेन्यु कॉलनीतील ५ लाख ६३ हजार २५२ रुपये किंमतीचे शरद बॅंक ते चाबुकस्वार घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण,शांतीनगर येथील १२ लाख ६५ हजार ६८८ रुपये किंमतीचे कॉंक्रिटिकरण करणे अशा सुमारे ४० लाख रुपये किंमतीच्या विकासकामांचे भुमिपुजन धारिवाल यांच्याहस्ते  करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्षा वैशाली वाखारे, बांधकाम समितीचे सभापती अभिजित पाचर्णे,पाणी पुरवठा सभापती विठ्ठल पवार,नगरसेवक मुजफ्फर कुरेशी,विनोद  भालेराव,नितीन पाचर्णे, संजय देशमुख, महिला बालकल्याण समिती सभापती सुनिता कुरंदळे,उपसभापती अंजली थोरात,स्वच्छता  व आरोग्य समिती सभापती सचिन धाडिवाल,शिक्षण समिती सभापती मनिषा कालेवार, मागासवर्गीय विशेष कल्याण समिती सभापती रेश्मा लोखंडे, नगरसेविका  ज्योती लोखंडे, उज्वला बरमेचा, संगिता मल्लाव, रोहिणी बनकर,सुरेखा शितोळे,पुजा जाधव, माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे,बांधकाम विभागाचे शहर अभियंते संजय कुंभार व नागरिक उपस्थित होते.शहरातील असणा-या अंगर्गत रस्त्याचे भुमिपुजन झाल्याने अनेक समस्या सुटण्यास मदत होणार असल्याचे मत बांधकाम समितीचे सभापती अभिजित पाचर्णे यांनी व्यक्त केले.पालिका सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असुन शहराचा सर्वांगिन विकास हेच आमचे उद्दिष्टय असल्याचे पाचर्णे यांनी बोलताना सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या