महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी: वैशाली वाखारे

Image may contain: 19 people, people smiling, people standingशिरुर,ता.१७ मे २०१८(प्रतिनीधी) : धावपळीच्या युगात महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असुन महिलांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांनी व्यक्त केले.

शिरुर नगरपालिकेच्या महिला बालकल्याण समिती व ग्रामीण रुग्णालय शिरुर यांच्या संयुक्त विद्यमाने सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर शहरातील महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे  नगरपालिका मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते.यावेळी वाखारे बोलत होत्या.

या मोफत आरोग्य शिबिरात शिरुर शहरातील सुमारे २३५ महिलांची तपासणी करण्यात आली.या शिबिरांतर्गत हिमोग्लोबिन,कॅल्शिअम,रक्तगट  तपासणी, शुगर आदींची तपासणी करुन निदान करण्यात आले.या वेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.एस.आर.रोकडे,डॉ.कैलास बत्ते, डॉ.अखिलेश राजुरकर, डॉ.स्मिता बोरा, डॉ.मनिषा चोरे, डॉ.सौ.पोटे आदी डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली.

या शिबिराला बांधकाम समितीचे सभापती अभिजित पाचर्णे,पाणी पुरवठा सभापती विठ्ठल पवार,नगरसेवक मुजफ्फर कुरेशी,विनोद  भालेराव,नितीन पाचर्णे, संजय देशमुख, महिला बालकल्याण समिती सभापती सुनिता कुरंदळे,उपसभापती अंजली थोरात,स्वच्छता  व आरोग्य समिती सभापती सचिन धाडिवाल,शिक्षण समिती सभापती मनिषा कालेवार, मागासवर्गीय विशेष कल्याण समिती सभापती रेश्मा लोखंडे, नगरसेविका  ज्योती लोखंडे, उज्वला बरमेचा, संगिता मल्लाव, रोहिणी बनकर,सुरेखा शितोळे,पुजा जाधव,मंगेश खांडरे,संदिप  गायकवाड, कार्यालयीन पर्यवेक्षक आयुब सय्यद,युवा स्पंदन च्या प्रियंका धोञे,आदीशक्तीच्या शशिकला काळे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. महिला बालकल्याण समिती सभापती सुनिता कुरंदळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या