पवार साहेब प्रधानमंञी झाल्यास आनंदच: सुशीलकुमार शिंदे

Image may contain: 2 people
शिरुर, ता. १८ मे २०१८ (प्रतिनीधी) : टिका करतो, भांडण करतो तरीपण ते पवार साहेब माझे मिञच आहेत.त्यामुळे पवार साहेब पंतप्रधान झाल्यास आनंदच होइल असे माजी मुख्यमंञी सुशिलकुमार शिंदे यांनी पञकारांशी बोलताना सांगितले.

शिरुर येथे एका कार्यक्रमानिमित्त माजी मुख्यमंञी,गृहमंञी सुशिलकुमार शिंदे यांनी पञकारांशी चहापाणादरम्यान संवाद साधला व विविध विषयांसह सध्याच्या राजकारणाविषयी चर्चा केली.

या वेळी बोलताना ते म्हणाले कि, मी महाराष्ट्राचा नेता आहे.जरी माझे नेते राहुल गांधी आहेत.पवारसाहेबांना देखिल सगळीकडुन पाठिंबा असतो.महाराष्ट्रातला प्रधानमंञी झाला तर कोणाला वाइट वाटेल ? मी तर त्यांचा मिञच आहे.टिका करतो,भांडण करतो तरी पण पर्मनंट मिञच आहे असे ते म्हणाले.


पुढे बोलताना ते म्हणाले कि, महाराष्ट्राच्या जनतेला मोदींचा चलाखपणा माहित झाला आहे.आजही यांना देशाच्या सिमेचं रक्षण करता येत नाही. मी गृहमंञी असताना मला 'क्या कर रहे हो शिंदेजी' असे म्हणत होते. परंतु एक सिर वो लेके जाएंगे तो हम ग्यारह सिर लाएंगे असे म्हणणा-यांनी कहा गये ग्यारह सिर लानेवाले..मै तो गिनती कर रहा हु असे सांगत यांच्या काळात चौपट मारले गेले आहेत असे सांगत मोदींवर निशाना साधला

इव्हीएम बाबत  बोलताना म्हणाले कि, राज ठाकरे हे अभ्यासु नेते आहेत.त्यांना चांगली तंञज्ञानाची समज आहे.त्यामुळे त्यांच्याशी सहमत असल्याचे ते म्हणाले.कर्नाटकातील निवडणुकिबाबत  ते म्हणाले कि, एका  राज्यात २३ सभा घेणारा पहिलाच पंतप्रधान पाहिला असुन एवढा घाबरणारा नेता कधी पाहिलाच नाही.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या