राजेंद्र थोरात यांच्या पुस्तकाला साहित्य परिषदेचा पुरस्कार

Image may contain: 1 personनिमोणे,ता.२० मे २०१८(तेजस फडके) :  येथील प्रा.डॉ.राजेंद्र दत्तात्रय थोरात यांच्या पुस्तकाला साहित्य परिषदेचा पुरस्कार जाहिर झाला आहे.

थोरात  यांच्या 'साहित्यकृतीचे माध्यमांतर' या संपादित ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे यांच्या वतीने दिला जाणारा 'माधुरी वैद्य पुरस्कृत श्रीवत्स प्रकाशन (संपादित ग्रंथ) पारितोषिक जाहीर झाले आहे.महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमाणपत्र आणि रोख रूपये 5000/- असे पुरस्काराचे स्वरूप आहे.सदर पारितोषिक वितरण समारंभ शनिवार (दि.26) रोजी एस.एम.जोशी सभागृह,पुणे येथे होणार आहे.ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध उडिया लेखिका मा.प्रतिभा राय यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.

साहित्यकृतीचे माध्यमांतर या ग्रंथाला 'सैराट' चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची मौलिक प्रस्तावना लाभलेली असून हे पुस्तक डॉ.राजेंद्र थोरात यांनी जेष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांना आदरपूर्वक अर्पण केले आहे.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या