रांजणगावला बिबट्याने चार शेळया केल्या फस्त

रांजणगाव सांडस,ता.२१ मे २०१८(प्रतिनीधी) : रांजणगाव सांडस(ता.शिरुर) येथील चेअरमन वस्ती वरील अनिल शिवाजी शेलार यांच्या गोठ्यातील 4 शेळ्यांचा बिबट्या ने फडशा पाडला तर एक बोकड उसाच्या शेतात ओढून नेले.

गोठयातिल शेळ्या बिबट्या ने फस्त केल्यामुळे या परिसरातील नागरिकांच्यात भीती चे वातावरण आहे या घटने चा पंचनामा वनविभागाने केला असून यांची नुकसानभरपाई ही देण्यासाठी प्रयत्न केला जाईल .तसेच या भागात अनेक वर्षे पासून बिबटया ला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी होत आहे नागरिकांवर हल्ले झाल्यावर वनविभाग पिंजरा लावणार आहे का ?अशी मागणी सुधीर शितोळे यांनी केले आहे .या भागात शेतकरी वर्ग रात्री दिवसा शेतात पाणी पुरवठा करणे गरजेचे असून ही या बिबटया च्या भीती ने शेतात जात नाही.परिसरात पिंजरे लावावा अशी नागरिकांनी मागणी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या