www.shirurtaluka.comच्या वर्धापनदिनाचे आयोजन

No automatic alt text available.शिरूर, ता. 21 मे 2018: राज्यात एखाद्या तालुक्याचे संकेतस्थळ निर्मितीचा मान मिळविलेल्या व शिरूर तालुक्यात आघाडीवर असलेल्या www.shirurtaluka.comचा 8वा वर्धापनदिन सोहळा 27 मे रोजी रांजणगाव गणपती येथे आयोजित करण्यात आहे. वर्धापनदिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून, वाघाळे येथील कलासागर प्रतिष्ठानने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

संकेतस्थळाच्या वर्धापनदिनानिमित्त प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये पाकिस्तानमधून सहिसलामत सुटून भारतात परतलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांचे खास आकर्षण असणार आहे. याशिवाय, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, सकाळचे संपादक सम्राट फडणीस, सकाळचे कार्यकारी संपादक शीतल पवार, राज्य महामार्गाचे पोलिस अधिक्षक अमोल तांबे, आमदार बाबूराव पाचर्णे, माजी आमदार सुर्यकांत पलांडे,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद, अभियंता हिमांशूराजे पवार (आमदाबादकर), उद्योजक विनय गायकवाड, तहसीलदार रणजीत भोसले,गटविकास अधिकारी संदिप जठार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख दयानंद गावडे, पोलिस निरिक्षक, राजेंद्र कुंटे, अमरनाथ वाघमोडे, संतोष गिरीगोसावी, www.shirurtaluka.comचे कार्यकारी संपादक सतीश केदारी, शिरूर तालुक्यातील आजी-माजी आमदार व पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार व संकेतस्थळावर प्रेम करणारे सर्व वाचक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कलासागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष ओंकार थोरात यांनी दिली.

दरम्यान, विधानसभेचे माजी अध्यक्ष वळसे-पाटील यांच्या हस्ते संकेतस्थळाचे प्रकाशन यांच्या हस्ते 26 मे 2011 रोजी विधान भवन येथे या संकेतस्थळाचे उद्‌घाटन झाले आहे. गेल्या सहा वर्षात संकेतस्थळाने विविध उपक्रम राबविले आहेत. शिवाय, आमच्या बातमीदारांनी दिलेल्या बातम्यांमुळे अनेक विषय मार्गी लागले आहेत. अर्थात, याला जोड आहे ती वाचक, जाहिरातदार व हितचिंतकांची. संकेतस्थळाला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे यशाचा ग्राफ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या सात वर्षात अविरतपणे संकेतस्थळाची वाटचाल सुरू आहे. बेधडक, अचूक व निपक्षीपातीपणे बातम्या व इतरत्र माहिती संकेतस्थळावर मिळत आहेत. यामुळे तालुका, जिल्हा, राज्य व विविध देशांमधील मराठी वाचक संकेतस्थळाशी जोडले गेले आहेत. संकेतस्थळाच्या यशामध्ये अनेकांचा मोलाचा वाटा आहे, हे मोल कशामध्येही न मोजता येणारे आहे.

Image may contain: 4 people, people standing
चंदू चव्हाण, पाकिस्तानमधून सहिसलामत सुटून भारतात परतलेले भारतीय जवान.

www.shirurtaluka.com8वा वर्धापनदिन....
दिनांक: 27 मे 2018
वेळ: सकाळी 10 वाजता.
स्थळ: रांजणगाव गणपती देवस्थान हॉल.
आयोजकः
कलासागर प्रतिष्ठान, वाघाळे
सत्कारमूर्तीः
सुर्यकांत पलांडे
प्रमुख उपस्थितीः
 • चंदू चव्हाण, पाकिस्तानमधून सहिसलामत सुटून भारतात परतलेले भारतीय जवान.
 • दिलीप वळसे पाटील, मा. विधानसभा अध्यक्ष
 • सम्राट फडणीस, संपादक, सकाळ.
 • शीतल पवार, कार्यकारी संपादक, सकाळ
 • अमोल तांबे, पोलिस अधिक्षक, राज्य महामार्ग.
 • बाबूराव पाचर्णे, आमदार
 • हिमांशूराजे पवार, आमदाबादकर
 • विनय गायकवाड, उद्योजक, कोंढापुरी.
 • सतीश केदारी, कार्यकारी संपादक.
 • रणजीत भोसले, तहसीलदार
 • दयानंद गावडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख.
 • पोलिस निरिक्षक: राजेंद्र कुंटे, अमरनाथ वाघमोडे, संतोष गिरीगोसावी,
शिरूर तालुक्यातील आजी-माजी आमदार व पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार व संकेतस्थळावर प्रेम करणारे सर्व वाचक.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या