दहिवडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी अनिता ढमढेरे

Image may contain: 1 person, standingदहिवडी,ता.२२ मे २०१८(प्रतिनीधी) : दहिवडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी अनिता ढमढेरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

दहिवडी ग्रामपंचायतमध्ये इतरांना  संधी देण्यासाठी उपसरपंच वाल्मिक सातकर यांनी राजीनामा दिला. सातकर यांच्या  राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर अनिता विलास ढमढेरे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक लता ठुबे यांनी काम पाहिले. यावेळी संतोष दौंडकर, वाल्मिक सातकर, अनिता ढमढेरे, स्मिता भालेराव, मिरा उकले,जयश्री भिवरे यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका सरचिटणीस राजेंद्र जाधव,भाजप सरचिटणीस गोरक्ष काळे,दादासो ढमढेरे, पोपट आरु, गजानन इंगळे,सुरेंद्र देव,राजेंद्र ढमढेरे,वसंत ढमढेरे,अरुण नेटके,प्रकाश दौंडकर, फक्कड दौंडकर, नवनाथ दौंडकर,सुभाष ईथापे,काशिनाथ दौंडकर तसेच युवक उपस्थित होते.

निवडीनंतर गावात झालेली विकास कामे आणि यापुढील करावयाची विकास कामे यांचा सर्वांशी चर्चा करून मेळ घालून गावचा विकास करू असे सरपंच संतोष दौंडकर यांनी मनोगत व्यक्त केले तर  उपसरपंच वाल्मिक सातकर यांनी संधी दिल्याबद्दल गावातील ग्रामस्थांचे आभार मानले आणि विकास कामात कायम सोबत राहील अशी ग्वाही दिली. यावेळी सुरेंद्र देव, गोरक्ष काळे, राजेंद्र जाधव या सर्वांनी मनोगत व्यक्त केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या