शिरुर तालुक्यातील कोतवाल पदाची आरक्षण सोडत जाहीर

शिरुर,ता.२२ मे २०१८(सतीश केदारी) : शिरुर तालुक्यातील १४ गावांतील रिक्त झालेल्या कोतवाल पदाच्या भरती आरक्षणाची सोडत नुकतीच जाहिर करण्यात आली.

शिरूर तालुक्‍यातील १४ गावांमध्ये कोतवाल पदासाठी भरती कार्यक्रम सुरू करण्यात आला असून, या बाबत शिरूर येथे सोमवारी (ता.२१) रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली

जाहिर केलेली सोडत  पुढीलप्रमाणे :

शिरूर-अनुसुचित जमाती, करडे-इतर मागास प्रवर्ग, पिंपरखेड-सर्वसाधारण (महिला), फाकटे-सर्वसाधारण (महिला), जांबूत-सर्वसाधारण), रांजणगाव सांडस-भटक्या जमाती (ब), मलठण-सर्वसाधारण (प्रकल्पग्रस्त/भुकंपग्रस्तांसाठी), कवठे-सर्वसाधारण, शिक्रापूर-अनुसुचित जमाती, निमगाव म्हाळुंगी-इतर मागास वर्ग (महिला), दहीवडी-भटक्या जमाती (ड), पिंपरी दुमाला-अनुसुचित जमाती (माजी सैनिक), पिंपळे जगताप-इतर मागास वर्ग (माजी सैनिक), कान्हूर मेसाई-भटक्या जमाती(क) या गावांतील कोतवाल पदासाठी भरती आरक्षण सोडत काढण्यात आल्याची माहिती तहसिलदार रणजित भोसले यांनी दिली.

राज्य शासनाच्या प्रशासन विभागातर्फे शिरूर तालुक्‍यातील १४ सजांचे कोतवाल पद रिक्त असल्याने नवीन पदे भरती करण्यात येत आहेत. या सोडतीनंतर पुढील भरती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या