शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत निवडणुकीत काट्याची लढत

Image may contain: text
शिरूर, ता. 23 मे 2018 (सतीश केदारी): शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दोन प्रबळ उमेदवारांमध्ये सरपंचपदासाठी काट्याची लढत होताना दिसत आहे. यामुळे या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय झाल्यानंतर प्रथमच या ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. सरपंचपद खुले असल्याने अनेकजण इच्छुक आहेत. इच्छुक उमेदवार सोशल मिडियाच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करत आहे. गावात अनेक व्हॉट्सऍप ग्रुप असून, अनेकजण ऍक्टीव झाले आहेत. सोशल मिडियाच्या माध्यमातून या निवडणूकीचा प्रचार केला जात आहे.

शिरूर (ग्रामीण) ग्रामपंचायत ही आमदार बाबूराव पाचर्णे यांचा बालेकिल्ला समजला असून, त्यांच्या प्रयत्नातून ही ग्रामपंचायत बिनविरोधही झाली आहे. प्रबळ इच्छुक असलेल्या दोन ते तीन जणांमध्ये एकमत न झाल्याने विठ्ठल घावटे व नामदेव जाधव या माजी उपसरपंचांमध्ये सरपंचपदासाठी काट्याची लढत होत आहे. ग्रामपंचायतीवर वर्चस्वासाठी दोन्ही बाजूंची प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसते. आमदार पाचर्णे यांचे रामलिंग पॅनेलला उघड समर्थन असून, त्यांच्याकडून सरपंचपदाची उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या नामदेव जाधव यांना राष्ट्रवादीने गळाला लावले आहे.

शिरूर बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांच्या नेतृत्वाखालील देव्हडेश्‍वर परिवर्तन पॅनेलचे अनिल पांडुरंग लोंढे, यशवंत देवराम कर्डिले, हिरामण हरिभाऊ जाधव, दमयंती लहू गायकवाड, शिवाजी पोपट दसगुडे, रंजना चंद्रकांत लोंढे, स्नेहल अमोल वर्पे, जयश्री अरुण महाजन, शहाजी शिवाजी पवार, कमल नवनाथ लोंढे व सरिता सुरेश सातकर; तसेच माजी सरपंच अरुण घावटे यांच्या नेतृत्वाखालील रामलिंग ग्रामविकास पॅनेलचे गणेश सदाशिव दसगुडे, विठ्‌ठल शंकर देव्हाडे, रूपाली संदीप दसगुडे, बाळासाहेब ऊर्फ सुनील फक्कड दौंडकर, रेखा श्रीकृष्ण शिंदे, सागर अरुण घावटे, दीपाली नानाभाऊ देंडगे, उज्ज्वला संदीप नेटके, सपना शरद महाजन, स्वाती अमोल बोऱ्हाडे, अभिलाष वसंत घावटे, नीता माधव घावटे व रंजना चंद्रकांत घावटे यांच्यात सदस्यांच्या 15 जागांसाठी लढत होत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या