जागृती प्रतिष्ठाणच्या अध्यक्षपदी बाळासाहेब वाघचौरे

Image may contain: 1 person, standingआंधळगाव, ता. २४ मे २०१८ (प्रमोल कुसेकर): आलेगाव पागा (ता.शिरूर) येथील सुप्रेरणा, सुसंस्कार जागृती प्रतिष्ठाणच्या अध्यक्षपदी बाळासाहेब चंदर वाघचौरे तसेच उपाध्यक्षपदी  लालासाहेब वाघचौरे यांची निवड करण्यात आली.

आलेगाव पागा येथे प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.तसेच कार्यकारणीचीही निवड करण्यात आली.दिलीप नहार(कार्याध्यक्ष),वैभव शिंदे (सचिव),संतोष आरवडे(सहसचिव),ॲड.बबन वाघचौरे,ॲड.संपत वाघचौरे (कायदेविषयक सल्लागार), प्रा. तुकाराम पोटे, प्रा. भाऊसाहेब भोसले, रंगनाथ गायकवाड, दत्ताञय मोरे, आण्णामहाराज फराटे, पञकार संजय गायकवाड, शिरुर तालुका डाँट काँमचे पञकार प्रमोल विश्वास कुसेकर यांची सल्लागारपदी निवड करण्यात आली. संपूर्ण तालुक्यात वृक्ष संवर्धन व वृक्ष लागवडीसाठी भरीव असे काम हे प्रतिष्ठाण करत असते.

शिरुर तालुक्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात वृक्षारोपण पंधरवडा साजरा करुन सर्वत्र पर्यावरणाविषयी जनजागृती अभियान राबविणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब वाघचौरे यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या