रांजणगाव पोलीसांच्यावतीने कारेगावात इफ्तार पार्टी

Image may contain: 10 people, including Satish Phand, people sitting, crowd and outdoorकारेगाव, ता.२४ मे २०१८ (सतीश डोंगरे) :  रांजणगाव एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या वतीने आज कारेगाव येथे मुस्लीम बांधवांच्या पवित्र  रमजान महिन्याच्या उपवासाचे निमित्त साधून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

कारेगाव येथील दरगाहवाली मश्जीद येथे हा रोजा इफ्तार पार्टीचा कार्यक्रम पार पडला.हिंदू-मुस्लिम समाजात जातीय सलोखा वाढावा,सर्वधर्म समभावाची संकल्पना वाढीस लागावी हा उद्देश या कार्यक्रमा पाठीमागे असल्याचे प्रतिपादन यावेळी पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी केले.
Image may contain: 8 people, people standing
या  कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे,नानासाहेब काळे, मिलिंद देवरे हे पोलीस कर्मचारी व पंचायत समिती सदस्य विश्वास कोहोकडे,सोसायटी चेअरमन दिलीप ताठे, उद्योजक राहुल गवारे, दिलावर शेख, चांदभाई शेख व इतर मोठ्या प्रमाणात हिंदू- मुस्लिम समाजातील प्रमुख लोक उपस्थित होते.अत्यंत  उत्साहाच्या वातावरणात रोजा इफ्तार पार्टी पार पडली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या