रांजणगावमध्ये जवान चंदू चव्हाण संवाद साधणार

Image may contain: 1 person, closeupरांजणगाव गणपती, ता 26 मे 2018: पाकिस्तानमधून सुखरूप सुटून भारतात परतलेले जवान चंदू चव्हाण यांच्याशी संवाद साधण्याबरोबरच पाकिस्तानमध्ये असताना झालेल्या अत्याचाराची माहिती त्यांच्याकडून ऐकायला मिळणार आहे.

www.shirurtaluka.com या संकेतस्थळाच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त "कलासागर' प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील अष्टविनायक महागणपती मंदिरात रविवारी (ता. 27) सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ओंकार थोरात यांनी दिली.
www.shirurtaluka.com8वा वर्धापनदिन....
दिनांक: 27 मे 2018
वेळ: सकाळी 10 वाजता.
स्थळ: रांजणगाव गणपती देवस्थान हॉल.
आयोजकः
कलासागर प्रतिष्ठान, वाघाळे
सत्कारमूर्तीः
सुर्यकांत पलांडे
प्रमुख उपस्थितीः
  • चंदू चव्हाण, पाकिस्तानमधून सहिसलामत सुटून भारतात परतलेले भारतीय जवान.
  • दिलीप वळसे पाटील, मा. विधानसभा अध्यक्ष
  • सम्राट फडणीस, संपादक, सकाळ.
  • शीतल पवार, कार्यकारी संपादक, सकाळ
  • अमोल तांबे, पोलिस अधिक्षक, राज्य महामार्ग.
  • बाबूराव पाचर्णे, आमदार
  • हिमांशूराजे पवार, आमदाबादकर
  • विनय गायकवाड, उद्योजक, कोंढापुरी.
  • सतीश केदारी, कार्यकारी संपादक.
  • रणजीत भोसले, तहसीलदार
  • दयानंद गावडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख.
  • पोलिस निरिक्षक: राजेंद्र कुंटे, अमरनाथ वाघमोडे, संतोष गिरीगोसावी,
शिरूर तालुक्यातील आजी-माजी आमदार व पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार व संकेतस्थळावर प्रेम करणारे सर्व वाचक.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या