पाकमध्ये अनेक यातना सहन केल्या: चंदू चव्हाण (Video)

Image may contain: 5 people, people sitting, people standing and indoorरांजणगाव गणपती, ता. 28 मे 2018: "आई-वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले. देशासाठी काही करावे ही तीव्र इच्छा मनात असताना दहावीपर्यंतचे शिक्षण घेऊन सैन्यदलात भरती झालो. भारत-पाक चकमकीत पाकच्या तावडीत सापडलो. अनेक यातना सहन केल्या. तीन महिने व 21 दिवस माझ्यासमोर मृत्यू दिसत होता. पण, मी हरलो नाही. शेतकऱ्यांनीही संघर्ष करावा, पण कोणत्याही स्थितीत आत्महत्या करू नये,'' असे आवाहन पाकिस्तानातून परतलेला जवान चंदू चव्हाण यांनी केले. आपला संघर्ष उलगडताना ते भावनाविवश झाले.

रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे www.shirurtaluka.com या संकेतस्थळाच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार सूर्यकांत पलांडे होते. कलासागर प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार सूर्यकांत पलांडे, "सकाळ'चे संपादक सम्राट फडणीस, कार्यकारी संपादक शीतल पवार, तहसीलदार रणजित भोसले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, संकेतस्थळाचे कार्यकारी संपादक सतीश केदारी, संगणक अभियंता हिमांशूराजे पवार, दीपाली शेळके, डॉ. अंकुश लवांडे,महेश ढमढेरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


चंदू चव्हाण म्हणाले, "माझ्यासारखे दुःख कोणाच्या वाट्याला येऊ नये. पाकिस्तानच्या जेलमध्ये प्रत्येक क्षणाला मृत्यू दिसत होता. दरम्यान, गावाकडे आजीचे निधन झाले. आजीसाठी रडू की, पकडलेल्या भावासाठी रडू, अशी परिस्थिती माझ्या भावाची झाली. अखेर तो दिवस उजाडला आणि पुनर्जन्म घेऊन मी भारतात परतलो. येथून पुढे देशासाठी जगत राहणार आहे. यातना सहन कराव्या लागल्या, परंतु देशाबद्दलची निष्ठा ढळू दिली नाही. आयुष्यात संघर्ष झाला, तरी डगमगू नका.''


यावेळी चंदू चव्हाण व सूर्यकांत पलांडे यांच्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तेजस फडके यांनी प्रास्तावीक, रावसाहेब चक्रे, दिलीप थोरात यांनी सूत्रसंचालन केले. सतीश केदारी यांनी स्वागत केले. संकेतस्थळाचे संस्थापक व 'सकाळ'चे वरिष्ठ उपसंपादक संतोष धायबर यांनी आभार मानले. कलासागर प्रतिष्ठानच्या ओंकार थोरात, संदिप धायबर, संतोष गोरडे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

https://scontent.fnag1-2.fna.fbcdn.net/v/t1.0-9/33693389_1669354516490011_8687307908691525632_n.jpg?_nc_cat=0&oh=919ddd5582e523cf9971d96b420bbff6&oe=5B784E24

सविस्तर वृतात लवकरच....

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या