शिरुर जवळ दुभाजकाला कार धडकून एकाचा मृत्यू

Image may contain: one or more people, car and outdoorशिरुर,ता.२९ मे २०१८(प्रतिनीधी) : शिरुर बायपास जवळ ब्रिझा कार दुभाजकाला धडकुन एकाचा मृत्यु तर अन्य चार जखमी झाल्याची घटना घडली.
Image may contain: 2 people, car and outdoor
या प्रकरणी गणेश एकनाथ शिंदे(रा.शिवरक्षा कॉलनी,रामलिंग रोड शिरुर) यांनी फिर्याद दिली आहे.तर अरविंद ताडगे यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,रविवार(दि.२७) रोजी फिर्यादी गणेश हे राञी अकरा वाजता स्वत:चे दुकान बंद करुन अरविंद ताडगे, गोकुळ बर्गे, इरफान सय्यद,व  गुप्ता टेलर असे अरविंद ताडगे यांच्या ब्रिझा कार (एम.एच.१२ एन.यु.८७८९) मध्ये बसुन जेवण करण्यासाठी गव्हानवाडी(ता.श्रीगोंदा) येथील एका हॉटेलवर गेले.

तेथुन जेवण झाल्यानंतर अहमदनगर पुणे रस्त्याने शिरुर कडे येत असताना शिरुर बायपास जवळील रिलायन्स पंपासमोर डिव्हायडर जवळ आले असता अचानक कार डिव्हायडर वर चढली व अपघात झाला.या वेळी अरविंद ताडगे, इरफान सय्यद, गुप्ता टेलर यांच्या हातापायास,डोक्यास गंभीर दुखापत झाली.तर फिर्यादीचा डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे.गोकुळ बर्गे हाही जखमी झाला आहे. सदरचा अपघात राञी दोनच्या सुमारास घडला आहे. या अपघातानंतर गंभीर जखमी असलेल्या अरविंद ताडगे यांना पुढील उपचारांसाठी पुणे येथे दाखल करण्यात आले होते परंतु ताडगे यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

या प्रकरणी शिरुर पोलीसांनी  गुन्हा दाखल केला असून, घटनेचा पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे वैभव मोरे हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या