ग्रामपंचायत निकालात 'कही खुशी कही गम' (Video)

Image may contain: 2 people, crowdशिरूर,ता.२९ मे २०१८(प्रतिनिधी) : संपूर्ण शिरूर तालुक्याचे लक्ष लागलेल्या शिरूर पंचक्रोशीतील पाच पैकी तर्डोबावाडी(बिनविरोध), अण्णापुर, शिरूर ग्रामीण  तीन ग्रामपंचायतीसह वाजेवाडी येथे  भाजपा पुरस्कृत पॅनेल चे सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले तर दोन ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेल चे  सरपंच निवडून आले आहे.

Image may contain: one or more people and crowdतर वाजेवाडी ग्रामपंचायत  निवडणुक मधे भाजप पुरस्कृत सरपंच निवडून आले आहे. तरी शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत मधे राष्ट्रवादी कॉंगेस ला बहुमत मिळाले असल्याने दोन्ही पक्षात कभी खुशी कभी गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .तर शिरूर पंचक्रोशीत आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या तर्डोबाचीवाडी या गावात त्यांनी बिनविरोध निवडणुक करण्यात यश आले असून महत्वाच्या शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत निवडणुकित सरपंचपदी  विठ्ठल घावटे हे त्यांच्या पक्षाचे निवडून आले असून त्यांना 1783 मते मिळाली असून राष्ट्रवादी चे नामदेव जाधव यांना 1753 मते मिळाली असल्याने केवळ जाधव यांचा तीस मताने पराभव झाला आहे.तर ग्रामपंचायतमधे राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत आठ सदस्य  निवडून आले आहेत .तर भाजपा पुरस्कृत सात सदस्य निवडून आले आहे.परंतु दोन्ही गटाने बहुमताचा दावा पञकार परिषदेत केला आहे.

सरदवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत विलास कर्डिले हे निवडून आले. कर्डिलवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदी राजेंद्र उर्फ तात्या दसगुडे हे निवडून आले आहे.अण्णापुर ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुरस्कृत सरपंचपदी दत्तात्रय कुरुंदळे व सर्व सदस्य निवडून आले.या ग्रामपंचायत मधे निवडणूक उमेदवारी  मागे घेण्याच्या नंतर गावाची बैठक घेऊन उमेदवार बाबत एक मत झाले असल्याने ही निवडणूक एकतर्फी झाली आहे.

तर्डोबावाडि ग्रामपंचायत सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत या  ठिकाणी आमदार बाबूराव पाचर्णे  यांनी आपला गड कायम राखला आहे.तर वाजेवाडी येथे धर्मराज वाजे यांची अनेक वर्षांची सत्ता यावेळी गेली आहे.तेथे भाजपा पुरस्कृत मनोज वाजे यांची सत्ता आली आहे.पैसे वाटपावरून गुन्हे दाखल झाल्याने हि ग्रामपंचायत चर्चेत आली होती.

शिरूर ग्रामीण (निवडुन आलेले अधिक सदस्य), सरदवाडी, कर्डिलवाडी याठिकाणी राष्ट्रवादी ची सत्ता आली असून बाजार समिती सभापती शशिकांत दसगुडे , राष्ट्रवादी चे येथील नेते शामकांत वर्पे, सरपंच विलास कर्डिले यांचा हा विजय असल्याचे बोलले जात आहे.या विजयाने राष्ट्रवादी कॉंग्रेस ची ताकद वाढली असली तरी भाजपा आमदार बाबूराव पाचर्णे यांना विचार करायला लावणारा निकाल शिरूर पंचक्रोशीतील आहे हेही विसरून चालणार नाही.आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या तर्डोबावाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून या ग्रामपंचायत मधे बाजार समिती संचालक, खरेदी विक्री संचालक संतोष मोरे यांच्या पत्नी धनश्री संतोष मोरे या सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.तर्डोबावाडी ग्रामपंचायत सरपंच पदासह सदस्यांची शिरूर हवेली चे आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवड झाली आहे. सरपंच पदी धनश्री संतोष मोरे यांची तर वेगवेगळ्या चार वॉर्डातील अकरा सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामध्ये वैशाली गुंजाळ,संपत ख्रिस,  तज्ञीका कर्डिले,संभाजी गोऱ्हे, गणेश खोले,अपर्णा पाचर्णे, महेंद्र पाचर्णे, गोपीनाथ पोटावळे, मनिषा देवकाते, वंदना पाडळे, रूपाली पवार अदिची नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य पदी बिनविरोध  निवड करण्यात आली.

शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत निकाल पुढीलप्रमाणे : 
विठ्ठल घावटे १७८३ विजयी, नामदेव जाधव १७५३

ग्रामपंचायत सदस्य पदी प्रभाग 2 मधून  आरती चव्हाण तर प्रभाग 4 मधून  नितीन बोऱ्हाडे बिनविरोध निवडून आले आहे .
प्रभाग 1 विजयी उमेदवार  अनिल लोंढे ३६५,तुषार दसगुडे १७३,संगीता दसगुडे ३०८
प्रभाग 2 विजयी उमेदवार  हिरामण जाधव ४६७, यशवंत कर्डिले ४६०,
प्रभाग 3 विजयी उमेदवार  सागर घावटे ५१८, उज्वला नेटके ४६४,दीपाली देंडगे ५१८,
प्रभाग 4 विजयी उमेदवार  स्नेहल वर्पे जयश्री महाजन ३७३,प्रभाग पाच विजयी उमेदवार अभिलाष घावटे ४८३,नीता घावटे ४७७,रंजना घावटे ४३४,

सरदवाडी ग्रामपंचायत
सरपंच पदी विलास कर्डिले ८८१मते मिळून विजयी झाले
सरदवाडी ग्रामपंचायत प्रभाग नीहाय विजयी उमेदवार 
प्रभाग 1 गणेश नीरवने ३०३ , स्वाती कर्डिले ३१८  , पुष्पा सरोदे  ३२२ ,
प्रभाग 2 किशोर सरोदे  ३२८, अनिता घावटे २९७.
प्रभाग 2 मधून पूनम शिवाजी कुंडलीक(बिनविरोध) ,योगेश कर्डिले (बिनविरोध)
प्रभाग 3 मधून कृष्णा घावटे, योगेश कर्डिले, कविता घावटे हे बिनविरोध निवडुन आले आहेत .

कर्डिलवाडी ग्रामपंचायत
कर्डिलवाडी ग्रामपंचायत सरपंच पदी राजेंद्र तुकाराम दसगुडे ५३७ मते मिळून विजयी झाले आहेत .
प्रभाग निहाय विजयी उमेदवार पुढील प्रमाणे
प्रभाग 1 दादाभाऊ कर्डिले २५१,संध्या धरणे १९०, रेखा शेळके २९७,
प्रभाग 2 भीमराज कऱ्हए २०४,ताराचंद कर्हे २१३, आशाबाई थोरात  २०७,
प्रभाग 3 संगीता फरगडे , अरुण फरगडे , बायसाबाई थोरात तिन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत .

आणापुर ग्रामपंचायत
सरपंच पदी दत्तात्रय कुरुंदळे १०९४ मते मिळून विजयी झाले आहेत.
प्रभाग नीहाय विजयी उमेदवार पुढील प्रमाणे
प्रभाग क्रमांक 1 पप्पू पवार ४९५, महेश कुरुंदळे ४४८,
प्रभाग क्रमांक 2 रवींद्र झंझाड २८६,मंगल रासकर २९२,कविता झंझाड २८३,
प्रभाग क्रमांक 3 कांता घावटे , लक्ष्मण कुरुंदळे लताताई रासकर हे तिघे बिनविरोध निवडून आले आहेत
प्रभाग क्रमांक 4 चार सुभाष कुरुंदळे १७८ , छाया इसवे  ३७७,

वाजेवाडी ग्रामपंचायत
वाजेवाडि सरपंचपदी  मोहन वाजे ६६२ मते मिळून निव्डून आले आहे.
प्रभागनिहाय विजयी उमेदवार पुढील प्रमाणे
प्रभाग एक गोपीचंद भोँडवे २३०, भारती लीहोट २६०, अनिता शिंदे २४८,
प्रभाग दोन आण्णा मांजरे २४१,  माधुरी वाजे २१६, शारदा मांजरे ३१७.
प्रभाग तीन अमित सोनवणे २३३, देविदास भोर २५४, अस्मिता तीखे २८३

डिंग्रजवाडी पोटनिवडणूकत विजयी शहाजी गव्हाणे २०४ मतांनी विजयी झाल्या आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या