Poll: मतदारांचा विश्वास सार्थ ठरविणार: आमदार पाचर्णे

Image may contain: 1 person, smiling, sitting

शिरूर
, ता. २९ मे २०१८ (प्रतिनीधी):
शिरूर ग्रामीण , आण्णापूर , वाजेवाडी , तर्डोबाची वाडी (बिनविरोध) या तीनही ग्रामपंचायतीवर भाजपने निर्विवाद यश मिळविले असुन सरदवाडी व कर्डिलेवाडी येथे बहुमत आमचे आले असून उपसरपंच  आमचाच होणार असा आत्मविश्वास शिरुर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी व्यक्त केला.

ग्रामपंचायत निवडणुक निकालावर भाष्य करताना पाचर्णे म्हणाले कि, शिरुर ग्रामपंचायतमध्ये जो पॅनेल उभा केला होता.त्यात आमचे आठ अधिकृत सदस्य निवडुन आले असुन शिरुर ग्रामीण ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच आमचाच होइल.शिरुर ग्रामीण(रामलिंग) ची दिवसेंदिवस वाढ होत असुन या भागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केल्याने हा विजयाचा कौल नागरिकांनी दिला आहे.तर्डोबाच्या वाडीत बिनविरोध निवडणुकित भाजपच्या धनश्री मोरे या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत तर ११ सदस्य बिनविरोध निवडुन आले आहेत.अण्णापुर येथे अर्ज माघारनंतर बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न केले व त्यात गावक-यांनी साथ दिली व यश आले.अण्णापुर ग्रामस्थांनी विकासाइतकाच एकोपा यानिमित्ताने जपला आहे. कर्डिलेवाडीत सरपंच या पुर्वी नव्हता तेथे संतोष कर्डिले यांना पाठिंबा  जाहिर केला.माञ तेथे निसटता पराभव झाला.तर बहुमत माञ मिळाले आहे.सरदवाडीत आत्मपरिक्षणाची गरज असुन तेथेही शिरुर ग्रामीण सारखी पाणीपुरवठा योजना राबविण्याचा आम्ही प्रयत्न करु. वाजेवाडीत सरपंच व सर्व सदस्य हे आमचेच निवडुन आले आहे.वाजेवाडीने जो विश्वास दाखविला आहे त्या गावासाठी विकासकामे करुन त्या गावाचे उत्तरदायित्व निभावण्याचा प्रयत्न करु असे यावेळी म्हणाले. सहाही ग्रामपंचायत निवडणुकित मतदारांनी जो विश्वास दाखविला त्याला कुठेही तडा जाऊ देणार नाही.

तर बाजारसमितीचे सभापती व देव्हडेश्वर पॅनेलचे प्रमुख शशिकांत दसगुडे यांनी शिरुर ग्रामीण च्या  सरपंच पदाच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले कि,शिरुर ग्रामीणच्या निवडणुकित आमदारांनी सत्तेचा दुरुपयोग करुन शासकिय यंञणेचा दुरुपयोग केला.आमच्या उमेदवाराचा थोड्या मताने पराभव झाला असून, हा नैतिकतेचा विजय असल्याचे दसगुडे यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या