Poll: जवान चंदू चव्हाण यांच्याकडे देवस्थानचे दुर्लक्ष

Image may contain: 4 people, people smiling, people standing
रांजणगाव गणपती, ता. 29 मे 2018: पाकिस्तानमधून सहिसलामत सुटून भारतात परतलेले जवान चंदू चव्हाण हे एका कार्यक्रमासाठी महागणपती मंदिरामध्ये रविवारी (ता. 27) आले होते. परंतु, रांजणगाव देवस्थान ट्रस्टने त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

जवान चंदू चव्हाण www.shirurtaluka.com या संकेतस्थळाच्या वर्धापनदिनानिमत्त रांजणगाव देवस्थानमध्ये आले होते. देवस्थानच्या हॉलमध्ये दोन तासांहून अधिक वेळ होते. चंदू चव्हाण हे देवस्थानमध्ये आल्याचे समजल्यानंतर भाविकांनी त्यांना गराडा घालून त्यांच्याशी चर्चा करत होते, शिवाय, अनेकजण सेल्फी सुद्धा घेत होते.

चंदू चव्हाण देवस्थान मंदिरामध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टला देण्यात आली होती. परंतु, देवस्थान ट्रस्टच्या वतीने कोणीही उपस्थित तर नव्हतेच पण साधी दखलही घेतली गेली नाही. एरव्ही राजकीय अथवा कलाकार दर्शनासाठी अल्यानंतर त्यांचा ट्रस्टच्या वतीने मोठा सत्कार केला जातो. छायाचित्रे काढून सोशल मिडियावर व्हायरल केली जातात. परंतु, जवान चव्हाण येणार असल्याची माहिती असूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. देशाच्या संरक्षणासाठी डोळ्यात तेल घालून जवान सीमेवर असतात. जवानांमुळेच नागरिक सुरक्षित आहेत. चंदू चव्हाण हे तर पाकिस्तानमध्ये चार महिने राहून सहिसलामत सुटून भारतात परतले आहेत. देशासाठी ते हिरो ठरले आहेत. रांजणगावमध्ये प्रथमच आले होते. परंतु, देवस्थान ट्रस्टने त्यांची साधी दखलही घेतली नाही.

देवस्थान कर्मचाऱयांना ही माहिती समजल्यानंतर त्यांनी पुढाकार घेऊन चव्हाण यांचा सत्कार करण्याचे ठरवले. दरम्यानच्या काळात चव्हाण हे परतीच्या प्रवासाला निघाले होते. देवस्थानमधील कर्मसाऱयांनी संपर्क साधून दीड किलोमीटर असलेल्या चव्हाण यांना थांबण्याची विनंती केली. चव्हाण थांबलेल्या ठिकाणी येऊन घटनेचे रमाकांत शेळके, संभाजी शेळके, राम फराटे यांनी चव्हाण यांचा शाल, श्रीफळ व ग्रंथ भेट देऊन सत्कार केला. सत्काराबद्दल चव्हाण यांनी आभार व्यक्त केले. संघटनेच्या कर्मचाऱयांनी देवस्थान ट्रस्टला घरचाच आहेर, दिल्याची चर्चा रंगली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या