शिरूरमधील डॉ. राजूरकर यांनी वाचविले जखमींचे प्राण

Image may contain: 1 person, standingशिरुर, ता.३० मे २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर येथील डॉक्टरांच्या तत्परतेमुळे व तातडीच्या वैद्यकिय उपचारांमुळे अपघातातील गंभीर जखमींचे प्राण वाचू शकले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शिरुर येथील बाह्यवळणावर रिलायन्स पेट्रोलपंपानजीक ब्रिझा कार हि रस्त्याच्या दुभाजकाला धडकुन मोठा अपघात घडला होता.अपघाताची घटना हि राञी दोनच्या सुमारास घडली होती. या घटनेत एकाचा मृत्यु झाला तर चार गंभीर जखमी झाले होते.

या घटनेबाबत श्रीगणेशा हॉस्पिटलचे डॉ. अखिलेश राजूरकर यांनी www.shirurtaluka.com ला माहिती देताना सांगितले कि, राञी दोनच्या दरम्यान अपघात घडला असावा.अपघातानंतर काही जखमींना तातडीने श्रीगणेशा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.दाखल केले त्या वेळी या अपघातातील जखमींची प्रकृती गंभीर होती. या सर्वांना तातडीचे योग्य उपचार मिळणे गरजेचे असताना यावेळी येथील हॉस्पिटलच्या कर्मचा-यांनी व इतर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करत व्हेंटिलेटर व इतर उपचार सुरु केले.डॉक्टर व कर्मचा-यांच्या बारा जणांच्या पथकाने तातडीने जखमी सर्वांना उपचार केले.तसेच उपचार झाल्यानंतर पुढील उपचारांसाठी दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेचीही व्यवस्था केली.अपघात झालेल्या कारच्या अवस्थेवरुन अपघाताची भिषणता  समोर येतेच परंतु डॉक्टरांनी मध्यराञी वेळेत उपचार केल्यानेच इतरांचे प्राण वाचू शकले आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या