न्हावरेत ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Image may contain: 1 personआंधळगाव, ता.३१ मे २०१८ (प्रमोल कुसेकर) : शिरुर-चौफुला रस्त्यावर ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक होउन आंधळगाव (ता.शिरुर) येथील एकाचा मृत्यु झाल्याची घटना घडली.

कुंडलिक (ननुदादा) बाबासाहेब कुसेकर(वय ३८)  असे अपघातात मयत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी कि घोडगंगा साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ रस्ता ओलाडंत असलेला ट्रक व न्हावरे येथुन आंधळगावकडे  आपल्या घरी जात असलेल्या कुंडलिक कुसेकर यांच्या दुचाकी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. यात कुंडलिक कुसेकर गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी न्हावरे व शिरुर येथे हलवण्यात आले.माञ उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, आई वडील, तीन बहिणी व एक भाऊ असा परिवार आहे. ते प्रगतशील शेतकरी होते. शिरुर कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व सेवानिवृत्त पोलिस अधिकारी बाबासाहेब रामचंद्र कुसेकर यांचे पुञ तर आंधळगाव  सोसायटीचे माजी अध्यक्ष उद्योजक आदीक बाबासाहेब कुसेकर यांचे बंधु होत. या प्रकरणी आदिकराव कुसेकर यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या