'आप के आ जाने से..' काकांच्या डान्सचा धुमाकुळ (Vdo)

Image may contain: 2 people, people standing and people on stage
शिरूर, ता. 1 जून 2018: 'दिल बहलता है मेरा.. आपके आ जाने से' हे गाणं कोणे एके काळी प्रचंड गाजलं होते, या गाण्यावर एका कांकांनी केलेला डान्स सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकुळ घालत असून, काकांच्या डान्सला नेटिझन्सनी मोठी पसंती दिली आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून काका चर्चेत आले आहेत.


लग्न समारंभ किंवा बर्थडे-अॅनिव्हर्सरीची पार्टी म्हटली की ती डीजेशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. 'डीजेवाले बाबू'ने तुमच्या आवडीचं गाणं लावलं, की शरीरही आपोआप त्या गाण्यावर डोलायला लागतं. गाण्यावर ठेका धरायला खरं तर वयाचं बंधन लागत नाही. चार वर्षांच्या चिमुरड्यापासून आजी-आजोबांपर्यंत सगळेच जण आपल्या काळातील आपल्या आवडीच्या कलाकाराच्या गाण्यावर बेभान नाचतात. आजकाल अवघड डान्सिंग स्टाईल्स लीलया करणारे अनेक हिरो-हिरोईन्स आपण पाहतो, त्यांचं कौतुकही करतो. पण स्वत: डान्स करायची वेळ येते तेव्हा, तुमच्या-आमच्या सारखे नॉन डान्सर्स 'गणपती डान्स' शिवाय ऐकत नाहीत. गोविंदा किंवा भगवान दादाच्या पॉप्युलर डान्स स्टेप्सच आपण फॉलो करतो.

गोविंदा आणि निलम यांच्या 'खुदगर्ज' (1987) चित्रपटातलं 'दिल बहलता है मेरा.. आपके आ जाने से' हे गाणं कोणे एके काळी प्रचंड गाजलं होतं. मोहम्मद अझिझ-साधना सरगम यांच्या आवाजातील या डान्स नंबरला गोविंदाने पुरेपूर न्याय दिला होता. काकांनीही डान्स करून नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. गोविंदाची डान्सिंग स्टाईलही होतीच हटके. ही स्टाईल अगदी हुबेहूब करुन दाखवणारे एक 'काका' सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काका म्हणायला फक्त वयापुरते.. त्यांचा जोश, त्यांची एनर्जी एखाद्या तरुणालाही लाजवेल अशी..

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या