व्यापारी महासंघाची ग्रामीण अपंग केंद्राला मदत

Image may contain: 7 people, people standing and outdoorशिरुर,ता.२ जुन २०१८(प्रतिनीधी) : शिरुर येथील व्यापारी महासंघाच्या वतीने टाकळी ढोकेश्वर(ता.पारनेर) येथील ग्रामीण अपंग केंद्राला सुमारे तीन लाख किमतीचे १० टन धान्य मदत म्हणून देण्यात आले.

टाकळी ढोकेश्वर येथील शाळेत ४२५ मुले व मुली, अपंग, मतीमंद यांचा सांभाळ केला जात आहे.गेल्या २२ वर्षा पासुन शिरुरच्या व्यापारी महासंघाच्या वतीने न चुकता या शाळेस भरीव मदत केली जात आहे. शिरुर नगरपालिकेचे सभागृह नेते प्रकाशभाउ धारीवाल शिरुर शहर विकास आधाडीचे अध्यक्ष सुभाष पवार यांनी या उपक्रमास मोठी मदत केली आहे. शिरुर शहरातुन या संस्थेस १० टन धान्याचा ट्रक भरून माल रवाना करण्यात आला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या